Mukhyamantri Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: महिलांसाठी आनंदाची बातमी! या आठवड्यात सर्व महिलांना मिळणार १५०० रुपये

Ladki Bahin Yojana Update: लाडकी बहीण योजनेत महिलांना १५०० रुपये दिले जातात. या योजनेत डिसेंबर महिन्याचा हप्ता कालपासून देण्यास सुरुवात झाली आहे.

Siddhi Hande

महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना सुपरहीट ठरली आहे. लाडकी बहीण योजनेचा फायदा हा विधानसभा निवडणुकीला झाला. या योजनेत डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे महिलांचे लक्ष होते. आता या योजनेत महिलांना कालपासून पैसे देण्यास सुरुवात होणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे लाडक्या बहि‍णींना लवकरच पैसे मिळणार आहेत. (Ladki Bahin Yojana)

लाडकी बहीण योजनेबाबत आदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे. लाभार्थी महिलांच्या खात्यात डीबीटीद्वारे पैसे जमा करण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिली.

या योजनेत ३ कोटी ३४ लाखांपेक्षा जास्त महिलांना हप्ता देण्यात येणार आहे. याव्यक्तिरिक्त आधार कार्ड लिंक झालेल्या लाभार्थ्यांनाही हप्ता दिसला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. (Ladki Bahin Yojana Update)

विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यावर आचारसंहिता लागू झाली होती. त्यामुळे महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नव्हते. त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होत नव्हता त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा हप्ता देण्यास उशीर झाल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, आता या योजनेत तुम्हाला लवकरच पैसे मिळणार आहे. डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत तुम्हाला पैसे मिळणार असल्याचे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले होते. देवेंद्र फडणवीसांनी सांगितल्याप्रमाणे या आठवड्यात महिलांना १५०० रुपये दिले जाणार आहे. मंगळवारपासून हे पैसे येण्यास सुरुवात झाली होती.

याआधी पाच महिन्याचे महिलांना साडेसात हजार रुपये देण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा १५०० रुपये महिलांच्या खात्यात जमा होत आहेत. तर २१०० रुपये महिलांना मार्च महिन्यापासून मिळू शकतात. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर महिलांना २१०० रुपये दिले जाण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Foods for constipation: सकाळी पोट व्यवस्थित साफ होत नाही? मग 'हे' ७ पदार्थ समाविष्ट करा, पोट राहील साफ

Viral Video : युद्ध नाही...तर यावेळी भारत- चीन सीमेवर रंगली शाहरुखच्या गाण्याची मैफिल; व्हिडिओ झाला व्हायरल

भोंदूबाबा अशोक खरातचा आणखी एक कारनामा, ६० कोटींचा डल्ला अन् १०० बनावट खाती, ७ दिवसांची पोलीस कोठडी

Karjat Fort : वीकेंडला कुठे फिरायला जाल? कर्जतजवळील 'हा' किल्ला ठरेल बेस्ट ऑप्शन

Maharashtra News Live: सोलापुरातील एमआयडीसी परिसरात टॉवेलच्या कारखान्याला आग

SCROLL FOR NEXT