Ladki Bahin Yojana Saam tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana : 3 हजारांच्या ऐवजी १५०० रुपये मिळाले, आता डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? महत्वाची माहिती समोर

Ladki Bahin Yojana update : लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबरचा हप्ता लाभार्थी महिलांना मिळाला आहे. परंतु डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार,या प्रतिक्षेत लाडक्या बहिणी आहेत.

Vishal Gangurde

लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबरच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

नोव्हेंबर महिन्याचा हप्ता २.५ कोटी महिलांना दिला

आता १८ व्या हप्ताबाबत महत्वाची माहिती अधिकाऱ्यांनी दिली

लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार, याकडे साऱ्या लाभार्थी महिलांचं लक्ष लागलं आहे. नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आतापर्यंत २.५ कोटी महिलांना देण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. राज्य सरकारने या आठवड्यात नोव्हेंबर महिन्यात १७ वा हप्ता देऊन लाडक्या बहि‍णींना खूश केलं आहे. मात्र, आता या योजनेचा १८ वा हप्ता कधी मिळणार, याकडे लाडक्या बहि‍णींचं लक्ष लागलं आहे.

राज्यातील लाडक्या बहि‍णींना नव्या वर्षाला बँक खात्यात प्रत्येकी ३-३ हजार रुपये मिळतील, अशी अपेक्षा होती. परंतु लाडक्या बहि‍णींना नोव्हेंबर महिन्यात प्रत्येकी १५००-१५०० रुपये बँक खात्यात जमा झाले आहेत.

महाराष्ट्रात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. या २९ महापालिकेच्या एकूण २८६९ जागांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. लाडक्या बहि‍णींना अधिक वेळ पैशांचा वाट पाहायला लावणे, महायुतीला महागात पडू शकतं, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. त्यानंतर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता लाडक्या बहि‍णींना देणे सुरू केला.

आता डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार, याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. विधानसभा निवडणुकीत महायुतीला सत्तेत आणण्यासाठी लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली होती. मात्र, त्यानंतर लाडकी बहीण योजनेचे बोगस लाभार्थी समोर आल्याने सरकारने ईकेवायसी प्रक्रिया सुरु केली.

लाडकींना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार?

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबरचा हप्ता लाभार्थी महिलांना पाठवण्यात आला आहे. परंतु डिसेंबर महिन्याचा हप्ता अर्थ विभागाने मंजूर केलेला नाहीये. निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे १५ जानेवारी रोजीच्या आधी डिसेंबरचा हप्ता मिळणे शक्य नसल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर लाडकी बहिणींना योजनेचा १८ वा हप्ता मिळण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fashion Tips: उंचीने कमी असलेल्या मुलींनी उंच दिसण्यासाठी फॉलो करावयाच्या ७ ड्रेसिंग टीप्स

Maharashtra Live News Update: वाशिमच्या रेल्वे स्टेशन परिसरात अज्ञात महिलेच्या डोक्यावर दगड घालून हत्या

KTM RC 160: धूम मचाले धूम..! ताशी ११८ किमीच्या स्पीडनं बाईक धावेल सुसाट; KTM RC 160च्या फीचससह लुक आहे खास

Marine Drive police rescue: जिवाची बाजी लावून पोलिसांनी केलं रेस्क्यू; महिलेला मृत्यूच्या दाढेतून काढलं बाहेर, Video सोशल मीडियावर व्हायरल

Rajya Sabha Election: राजकारण तापलं! ५ जागांसाठी महाआघाडीत बिघाडी; NDAमध्येही हालचालींना वेग

SCROLL FOR NEXT