LADKI BAHIN YOJANA INSTALLMENT UPDATE SaaM TV
बिझनेस

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट! 'या' महिलांना मिळणार नाही हप्ता; तुमचं यात नाव नाही ना?

Ladki Bahin Yojana July Installment Update News : लाडकी बहीण योजनेचा ५३ हजार ६३७ महिलांना हप्ता मिळणार नसल्याची माहिती समोर आली आहे. जाणून घ्या संपूर्ण अपडेट.

Alisha Khedekar

  • लाडकी बहीण योजनेच्या जुलैच्या ₹१,५०० हप्त्याची रक्कम महिलांच्या खात्यात जमा

  • सुमारे ५३ हजार ६३७ महिलांना जुलैचा हप्ता हुकला

  • विविध कारणांमुळे महिलांना मिळणार नाही हप्ता

लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. रक्षाबंधनाचं औचित्य साधून मंगळवारपासून महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा जुलैचा हप्ता खात्यात यायला सुरुवात झाली आहे. असं असलं तरी राज्यातील सुमारे ५३ हजार ६३७ महिलांना विविध कारणांमुळे जुलै महिन्याचा हप्ता मिळाला नसल्याचे समोर आले आहे. यापूर्वी लाभार्थी यादीची पडताळणी आणि ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर महिलांची नावे यादीतून वगळण्यात आली. परंतु आता ज्या महिलांच्या खात्यात १५०० आलेले नाहीत त्यांचे टेन्शन वाढले आहे.

मंगळवारी संध्याकाळपर्यंत सुमारे १ कोटी ४१ लाख ८५ हजार महिलांच्या बँक खात्यांमध्ये २ हजार ९५ कोटी रुपयांचा निधी जमा करण्यात आला. उर्वरित लाभार्थी महिलांच्या खात्यातही निधी जमा करण्याची प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे आणखी सुमारे २३ लाख महिलांना आज म्हणजे रक्षाबंधनाच्या दिवशी हप्ता मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

राज्य सरकारने जून २०२४ मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. सुरुवातीला या योजनेतील लाभार्थी महिलांची संख्या मोठी होती. मात्र, त्यानंतर आधार क्रमांक, ई-केवायसी, उत्पन्नाची अट, कुटुंबातील शासकीय कर्मचारी, इतर शासकीय योजनांचा लाभ आणि इतर पात्रता निकषांची पडताळणी करण्यात आली. या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर लाभार्थी अपात्र ठरले.

एप्रिल अखेरपर्यंत अर्ज केलेल्या २ कोटी ४८ लाख महिलांपैकी सुमारे ९२ लाख नोंदी अपात्र ठरवण्यात आल्या आहेत. त्यामुळे योजनेतील पात्र लाभार्थी महिलांची संख्या सुमारे १ कोटी ६५ लाखांवर आली आहे. दरम्यान, योजनेच्या पात्रतेमध्ये २१ ते ६५ वर्षे वयोगटातील महिला हा महत्त्वाचा निकष आहे. ६५ वर्षांची वयोमर्यादा ओलांडलेल्या महिलांना योजनेचा लाभ सुरू ठेवता येत नसल्याने यावेळी मोठ्या संख्येने महिलांची नावे वगळण्यात आली आहेत. त्यामुळे सुमारे ५३ हजार ६३७ महिलांना जुलै महिन्याच्या हप्त्यापासून वंचित राहावे लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : थंडगार वारा अन् हिरव्यागार डोंगररांगा; ऑक्टोबरच्या उकाड्यात फिरा मुंबईजवळची 'ही' ७ भन्नाट ठिकाणं

डोळ्यांत राग, आक्रमक बाणा, राहुल-प्रियंका गांधी जमिनीवरच झोपले, पोलिसांनी उचलून बसमध्ये टाकलं, दिल्ली आंदोलनातील 6 PHOTO

Maharashtra News Live Update: पुणे शिक्षक विधान परिषद निवडणुकीसाठी 48 उमेदवार रिंगणात

ऐन निवडणुकीच्या काळात भाजपला मोठा धक्का! माजी खासदाराचा तडकाफडकी राजीनामा

Numerology: 'स्टाईलबाज' अन् रोमँटिक असतात 'हा' मुलांक असलेली लोकं; शुक्र देवाची असते कृपा

SCROLL FOR NEXT