Ladki Bahin Yojana google
बिझनेस

Ladki Bahin Yojana : रक्षाबंधनाला लाडक्या बहि‍णींना मिळणार एकत्रित ३००० रुपये? मोठी अपडेट समोर

Ladki Bahin Yojana July installment date : रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींना ३,००० एकत्र मिळणार का? जुलै हप्ता कधी जमा होणार आणि सरकारची अधिकृत भूमिका काय आहे, जाणून घ्या.

Sakshi Sunil Jadhav

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ महाराष्ट्रातल्या गरजू महिलांना होत आहे. या योजनेमध्ये महिलांना दरमहा १५०० रूपयांचा हप्ता दिला जातो. याचा फायदा महिलांना गरजेच्या वस्तू खरेदीसाठी किंवा घर खर्च भागवण्यासाठी होतो. नुकताच जून महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावर पाठवण्यात आला. हा हप्ता १५ जुलै रोजी पाठवण्यात आला. आता जुलै महिन्याच्या हप्त्याबद्दल महिलांच्या मनात उत्सुकता वाढली आहे. जुलै महिन्याचा हप्ता आला नाही तर ३००० रुपये मिळणार का? असा प्रश्न लाडकींच्या मनात आहे. याच संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे.

जुलै महिन्याचा कधी जमा होणार?

ऑगस्ट महिन्याच्या १५ तारखेपर्यंत जुलै महिन्याचा हप्ता येण्याची शक्यता आहे. कारण मागच्या काही महिन्यांचे पैसे याच दिवशी महिलांच्या खात्यात पाठवले गेले होते. त्यातच या महिन्यात २८ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन हा महिलांच्या आवडीचा सण आहे. २०२४ प्रमाणे यंदाच्या वर्षीही ३००० रुपये एकत्र मिळणार का? असा लाडक्या बहीणींचा प्रश्न आहे.

रक्षाबंधनाची भेट म्हणून ३००० रुपये एकत्रित मिळणार का?

२०२४ रोजी महिलांना २ महिन्यांचे एकत्रित ३००० रुपये पाठवण्यात आले होते. तर यंदा सुद्धा रक्षाबंधनाच्या दिवशी लाडक्या बहि‍णींना ३००० रुपयांचा एकत्रित हप्ता मिळण्याची शक्यता आहे. या महिन्यात १५ ऑगस्टपर्यंत हप्ता जमा झाला नाही, तर २ महिन्यांचा हप्ता एकत्र मिळण्याची शक्यता आहे.

जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा समोर आलेली नाही. त्यामुळे लाडक्या बहि‍णींनी १५ ऑगस्टपर्यंत हप्त्याची वाट पाहणं योग्य राहील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

SCROLL FOR NEXT