Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: ऑगस्टच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट, लाडकीच्या खात्यावर या दिवशी ₹1500 येणार

Majhi Ladki Bahin Yojana August Month Installment: लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्टच्या हप्त्याची महिला आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, आता लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यासाठी निधी वर्ग करण्यात आला आहे.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट

ऑगस्टचा हप्ता कधी येणार?

ऑगस्टच्या हप्त्यासाठी ३४४ कोटींचा निधी वर्ग

लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्टच्या हप्त्याची कोट्यवधी महिला वाट पाहत आहेत. ऑगस्ट महिना संपला, सप्टेंबर महिना सुरुदेखील झाला. तरीही अद्याप लाडकीच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. त्यामुळे लाडक्या बहिणी चिंतेत होत्या. मात्र, आता त्यांना लवकरच पैसे देण्यात येणार आहे.

लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यासाठी निधी वर्ग (Ladki Bahin Yojana August Month Installment)

लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्टच्या हप्त्यासाठी निधी वर्ग करण्यात आला आहे. लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यासाठी जवळपास ३४४ कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला आहे. त्यानंतर आता हे पैसे महिलांच्या खात्यात ट्रान्सफर केले जाणार आहे. येत्या ३ ते ४ दिवसांत पैसे जमा केले जाण्याची शक्यता आहे. मंगळवारी हा निधी वर्ग करण्यात आला आहे. त्यानंतर पुढच्या काही दिवसांत महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होईल. याबाबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे स्वतः माहिती देतील. त्यानंतरच महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील.

लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्टच्या हप्त्यासाठी निधी वर्ग करण्यात आला आहे. दरम्यान, ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्र येईल, असं सांगितलं जात होतं. मात्र, यावेळी फक्त ऑगस्टच्या हप्त्यासाठी निधी देण्यात आला आहे. त्यामुळे ऑगस्टचा हप्ता स्वतंत्रपणे दिला जाईल.

या महिलांना मिळणार नाही ऑगस्टचा हप्ता (These Women Will Not Get August Month Installment)

लाडकी बहीण योजनेसाठी सध्या २ कोटी ४८ लाभ महिला लाभार्थी आहेत. लाडकी बहीण योजनेतून लाखो महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. या महिलांनी निकषांबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतला असल्याचे समोर आले आहेत. त्यामुळे या महिलांची पुन्हा पडताळणी करण्यात आली. यातून ज्या महिला अपात्र आहेत त्यांची नावे काढून टाकण्यात आली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मावळमध्ये महाविकास आघाडीची घोषणा, पाच पक्ष आले एकत्रित, पण सत्ता मिळेल का?

Cyclone Alert : ‘मोंथा’ चक्रीवादळाचा महाराष्ट्राला तडाखा! राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, कोणत्या जिल्ह्यात कोसळधार?

Bihar Chhath Puja : छठ पूजेच्या उत्सवावर दु:खाचा डोंगर, बिहारमध्ये ८३ जणांचा मृत्यू

Auspicious Yog Today: आज कार्तिक शुक्ल सप्तमी; बुध ग्रहाची कृपा आणि चंद्राचा मकर प्रवेश ठरणार शुभ

Beach Travel: गर्दीपासून सुटका हवीये? पर्यटकांना भुरळ घालणारे ८ सर्वाधिक स्वच्छ समुद्रकिनारे, एकदा भेट द्याच

SCROLL FOR NEXT