Augest installment ladki bahin yojana meta ai
बिझनेस

Ladki Bahin Yojana: खुशखबर! लाडक्या बहिणींच्या खात्यात 'या' तारखेला येणार ₹१,५००; ऑगस्ट हप्त्याची नवीन अपडेट समोर

Ladki Bahin Yojana August Installment Date : लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता २४ सप्टेंबरनंतर टप्प्याटप्प्याने महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता असून अधिकृत घोषणेची प्रतीक्षा आहे.

Sakshi Sunil Jadhav

राज्यात गणेशोत्सवाचा उत्साह सुरू असतानाच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी दिलासादायक अपडेट समोर आली आहे. ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या महिलांच्या खात्यात लवकरच ₹१,५०० जमा होण्याची शक्यता आहे. मंत्रालयातील विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, २४ सप्टेंबरनंतर या हप्त्याच्या वितरणाला सुरुवात होऊ शकते.

२४ सप्टेंबरनंतर टप्प्याटप्प्याने पैसे?

विश्वासू सुत्रांना मिळालेल्या माहितीनुसार, पात्र महिलांच्या खात्यात ऑगस्ट महिन्याचे १५०० रुपये टप्प्याटप्प्याने जमा केले जाऊ शकतात. गणपती विसर्जनाच्या काळात निधी वितरणाला सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात महिलांना आर्थिक मदत मिळू शकते. मात्र, ही सध्या संभाव्य तारीख असून अधिकृत निर्णयाची प्रतीक्षा आहे.

तांत्रिक आणि प्रशासकीय कारणांमुळे विलंब

ऑगस्ट महिन्याचा हप्ता याआधीच मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, काही तांत्रिक आणि प्रशासकीय प्रक्रियांमुळे निधी वितरणाला उशीर झाल्याचे सांगितले जात आहे. आता निधी वितरणाची प्रोसेस अंतिम टप्प्यात असल्याची माहिती समोर येत आहे. रक्कम पात्र लाभार्थींच्या बँक खात्यात DBTच्या माध्यमातून जमा केली जाणार आहे.

१ कोटी ६६ लाख महिलांना मिळणार लाभ

ई-केवायसी प्रोसेसनंतर लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी महिलांची संख्या सुमारे १ कोटी ६६ लाख असल्याची माहिती समोर आली आहे. या पात्र महिलांना योजनेअंतर्गत दरमहा १५०० रुपये आर्थिक मदत देण्यात येते आणि ती DBT द्वारे बँक खात्यात जमा केली जाते.

जुलैचा हप्ता यापूर्वी जमा

ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर जुलै महिन्याचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. आता ऑगस्ट महिन्याच्या १५०० रुपयांच्या हप्त्याकडे महिलांचं लत्र लागलं आहे. २४ सप्टेंबरनंतर पैसे होण्याची माहिती समोर आली असली, तरी अधिकृत घोषणा झाल्यानंतरच निश्चित तारीख स्पष्ट होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जंतर-मंतरवर सीजीपीचं आंदोलन, दिल्लीतील इंटरनेट सेवा बंद

भाजपला मोठा झटका! नागपूरमधील बड्या नेत्याचा थेट राजीनामा; पक्ष सोडताना सांगितले मोठे कारण

Diwali Holidays : दिवाळीच्या सुट्टीत मुलांना कसं ठेवाल व्यस्त? जाणून घ्या ६ भन्नाट उपाय

Abhijeet Dipke : "नरेंद्र मोदींना युवकांची भीती वाटते तर मग खुर्चीवर..."; दीपकेंचा संतप्त प्रतिक्रिया, राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra Weather : ऑक्टोबर हिटचा भयानक प्रकोप! कोकणात उष्णतेचा इशारा; तर 'या' जिल्ह्यांत धो-धो पावसाचा हायअलर्ट

SCROLL FOR NEXT