Schemes for Women Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: फक्त 'लाडकी बहीण'च नव्हे तर महिलांसाठी खास ३ योजना, खटाखट पैसे येतात खात्यात

Maharashtra Government Scheme For Women: केंद्रासोबतच राज्य सरकारनेही महिलांसाठी काही योजना सुरु केल्या आहेत. या योजनांच्या माध्यमातून महिलांना आर्थिक मदत केली जाते.

Siddhi Hande

केंद्र सरकारने महिलांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. केंद्रासोबतच महाराष्ट्र सरकारनेही महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी योजना सुरु करण्यात आल्या आहेत.या योजनांमध्ये महिलांना आर्थिक मदत मिळते. महाराष्ट्र सरकारच्या अशाच काही योजनांबद्दल आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana)

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात.या पैशांमुळे लाडक्या बहि‍णींना आर्थिक मदत मिळते. यासाठी काही पात्रता निश्चित करण्यात आल्या आहेत. या निकषांमध्ये बसणाऱ्या महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.

लेक लाडकी योजना (Lek Ladki Yojana)

लेक लाडकी योजनेत मुलींना शिक्षणासाठी मदत केली जाते.लेक लाडकी योजनेत मुलीच्या शिक्षणासाठी वयोनुसार पैसे दिले जातात. या योजनेत तब्बल १ लाखांपर्यंत मुलींना मदत दिली जाते. मुलगी जन्माला आल्यावर ५००० रुपये, पहिलीत गेल्यावर ६००० रुपये आणि सहावीत गेल्यावर ६००० रुपये दिले जातात. यासाठीही काही पात्रता आहेत.

मातृ वंदना योजना (Matru Vandana Yojana)

केंद्राने मातृ वंदना योजना सुरु केली आहे. या योजनेत गरोदर महिलांना ६००० रुपये दिले जातात. पहिल्या मुलीच्या जन्मावेळी ५००० रुपये दिले जातात. तर दुसऱ्या मुलीच्या जन्मावेळी ६००० रुपये दिले जातात. गरोदर महिलांना पोषक आहार मिळावा, या उद्देशातून ही योजना सुरु करण्यात आली आहे.

सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samruddhi Yojana)

सुकन्या समृद्धी योजनेत सर्वाधिक परतावा मिळतो. या योजनेत १० वर्षांपेक्षा कमी वयोगटातील मुलींच्या नावे अकाउंट उघडू शकतात. त्यातील गुंतवणूक ही जास्त फायद्याची ठरते. या योजनेत सरकार सर्वाधिक व्याज देते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: हापूस आंब्यात होतेय मोठ्या प्रमाणात भेसळ, हापूसच्या नावावर खपवला जातोय कर्नाटकी आंबा

Pune Crime: पुणे हादरले! अल्पवयीन मुलीवर सुरक्षारक्षकाकडून बलात्कार, पीडिता ५ महिन्यांची गरोदर

Bigg Boss Marathi : ८ वर्षांनी बिग बॉस मराठीत घडला इतिहास, तन्वी कोलतेची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी

Actress Death: प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन; राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास, सिनेविश्वात हळहळ

Jio Cheapest Recharge: खुशखबर! Jio चा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान; वर्षभर वापरा पण किंमती फक्त एवढीच...

SCROLL FOR NEXT