Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी बातमी! तब्बल ८४ हजार महिलांचा लाभ बंद ; मिळणार नाही १५०० रुपये

Ladki Bahin Yojana 84000 Women Not get Benefit Of Scheme: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता तब्बल ८४ लाख महिलांचा लाभ बंद होणार आहे.

Siddhi Hande

लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी

आता लाडकी बहीण योजनेतून ८४ हजार महिलांचे अर्ज बाद होणार

नागपूरमध्ये महिलांच्या अर्जांची पडताळणी सुरू

लाडक्या बहि‍णींचे टेन्शन वाढवणारी बातमी आहे. आता लाडकी बहीण योजनेतून आणखी काही महिला अपात्र होणार आहेत. नागपूरमधील तब्बल ८४ हजार लाभार्थी महिलांचे लाभ बंद केले जाण्याची शक्यता आहे. आता लाडकी बहीण योजनेतील अनेक महिलांनी निकषांबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतला आहे. त्याचीच पडताळणी सुरु आहे. त्यातून ८४ हजार महिला अजून अपात्र होण्याची शक्यता आहे.

लाडक्या बहिणी अपात्र होण्यामागचे कारण

एकाच कुटुंबात चक्क तीन ते चार लाडक्या बहिणीने योजनेचा लाभ घेतला असणाऱ्यांचा पत्ता आता कट होणार आहे.प्रशासन आता अलर्ट मोडवर आले आहे. आता या महिलांच्या नावावर एफएससी मल्टिपल इन फॅमिली असा शेरा मारून योजनेतून बाद केले जाणार आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एका कुटुंबातील दोन महिलांना लाभ मिळणार असतानाही तिसऱ्या आणि चौथ्या महिलांनी अर्ज केल्याचे समोर आले आहे.

नागपूरमधील ८४ हजार महिलांना मिळणार नाही १५०० रुपये (Nagpur 84000 Women Will Not Get 1500 Rupees)

अनेकांनी वय १८ असताना देखील अठरा वर्षे पूर्ण झाल्याचे दाखवून अर्ज केल्याच बोललं जातं आहे. त्यामुळे वयोमर्यादेत बसत नसतानाही योजनेचा लाभ घेतला आहे.या सगळ्या बाबी प्रशासनाने अलर्ट मोडवर येऊन तपासायला सुरुवात केली, त्यामुळे आता हजारो महिलांचा लाभ बंद होण्याची शक्यचा आहे. नागपूर जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचे पाच लाख 19 हजार 267 लाभार्थी आहेत. त्यातील ८४ हजार महिलांचे अर्ज बाद होण्याची शक्यता आहे

लाडकींच्या अर्जांची पडताळणी

विविध माध्यमातून आता पडताळणी सुरू झाली आहे. यात 84 हजार लाभार्थी संशयाच्या भोवऱ्यात असल्याची माहिती सुद्धा पुढे आलीय, मात्र अजून प्रशासनाकडे कडून तपासणी सुरूच आहे. ही तपासणी पूर्ण झाल्यानंतरच अपात्र महिलांचे अर्ज बाद केले जाणार आहेत.

लाडकी बहीण योजना कोणत्या विभागाद्वारे चालवली जाते?

लाडकी बहीण योजना महिला व बालविकास विभागाद्वारे चालवली जाते.

महिला व बालविकास विभागाच्या मंत्री कोण आहेत?

महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे आहेत.

लाडकी बहीण योजनेतून किती महिला अपात्र ठरल्या?

लाडकी बहीण योजनेतून आतापर्यंत जवळपास ४२ लाख महिला अपात्र ठरल्याचे सांगितले जात आहे.

लाडकी बहीण योजनेची पडताळणी सुरु झाली?

लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जांची पडताळणी सुरु झाली आहे.

लाडकींच्या अर्जांची पडताळणी कशी होणार?

अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी करणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Online Tenancy Agreements : भाडेकराराची नोंदणी ऑनलाइनच, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Jamnagar Tragedy : गणेश मूर्तीचं विसर्जन करताना पाण्याचा अंदाज चुकला; एकाच कुटुंबातील तिघांचा बुडून मृत्यू

Maharashtra Government: राज्य सरकार मोठे निर्णय घेणार! ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नवी पात्रता लागू

Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा धसका? मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक

Manoj Jarange Patil: भगवे रुमाल, टोप्या घालून ४०-५० पोलीस आंदोलनात शिरलेत; जरांगेंचा मोठा आरोप

SCROLL FOR NEXT