Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: ५० लाख लाडक्या बहि‍णींचे अर्ज बाद होणार; सरकारचे किती पैसे वाचणार?

Ladki Bahin Yojana News: लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जांची तपासणी सुरु झाली आहे. आतापर्यंत ९ लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहे. ५० लाख महिलांचे अर्ज बाद करणार असल्याचे सांगितले जात आहे.

Siddhi Hande

विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये मिळतात. या योजनेत महिलांच्या अर्जांची पडताळणी सुरु झाली आहे. या योजनेत आतापर्यंत जवळपास ९ लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत.

लाडकी बहीण योजनेत ५० लाख महिलांचे अर्ज बाद करणार असल्याचे सांगितले जात आहे. या योजनेतील लाभार्थी महिलांची संख्या २ कोटी ४६ लाख आहे. त्यातून ५० लाख अपात्र महिलांना योजनेतून बाहेर काढले जाणार आहे. यामुळे सरकारच्या तिजोरीवरचा ताण कमी होणार आहे.

जर लाडकी बहीण योजनेतून ५० लाख महिला अपात्र झाल्या तर दरवर्षाला १ हजार ६२० कोटी रुपये वाचणार आहे. या योजनेत दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. दर महिन्याला सरासरी ३ हजार ७०० कोटी रुपयांचा हप्ता वितरित केला जात आहे. तापर्यंत सहा महिन्यात तब्बल २१ हजार ६०० कोटी रुपयांचा हप्ता वितरित करण्यात आला आहे.

लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील इतर योजनांवर ताण पडत आहे. या योजनेमुळे इतर अनेक योजनांचे पैसे थकले असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा सरकारच्या तिजोरीवर ताण पडत असल्याचे दिसत आहे.

लाडकी बहीण योजनेतून ५० लाख महिला महिला अपात्र होणार?

लाडकी बहीण योजनेत सध्या लाभार्थी महिलांच्या अर्जांची पडताळणी करण्यात येत आहे. ही पडताळणी पाच टप्प्यांमध्ये होणार आहे. यामध्ये महिलांची वयोमर्यादा, इन्कम टॅक्स भरत असलेल्या महिला, चारचाकी वाहन असलेल्या महिलांची तपासणी केली जात आहे. जानेवारी महिन्यात ५ लाख महिलांचे अर्ज बाद केले आहेत. तर फेब्रुवारी महिन्यात ४ लाख महिलांचे अर्ज बाद झाले आहे. यामुळे सरकारी तिजोरीवरचा बोजा कमी होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Political Leaders Retro Look: PM मोदी, राहुल गांधी ते उद्धव ठाकरेंपर्यंत...; नेत्यांचे फोटो 80sचा रेट्रो, सोशल मीडियावर चर्चेला उधाण

'सरकारला जरांगे पाटलांना मारायचंय'; संजय राऊतांचा सरकारवर खळबळजनक आरोप

Maharashtra Politics: भाजप आणि शिंदेसेनेचे आमदार भिडले; महालेंनी डिवचलं, गायकवाडांनी धमकावलं

डान्सरचा धांगडधिंगा, कारवाईचा बडगा; निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह 8 डान्सर्सवर गुन्हा

Fact Check: मंदिर पाडलं, हनुमान हलेना? 1000 वर्षांपूर्वीची प्राचीन मूर्ती असल्याचा दावा?

SCROLL FOR NEXT