Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नाहीत? ही प्रोसेस केल्यास खात्यात लगेच जमा होतील!

Maharashtra Government Scheme Updates in Marathi: लाडकी बहीण योजनेत तिसरा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. अनेक महिलांच्या अकाउंटला पैसे जमा झाले आहेत तर अनेक महिलांच्या खात्यात पैसे आले नाहीत.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या अकाउंटला जमा होण्यास सुरुवात झाली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. अनेक महिलांच्या अकाउंटला पैसे जमा झाले आहेत.तर अनेक महिलांच्या अकाउंटला अजूनही पैसे जमा झाले नाही.

लाडकी बहीण योजनेचे पैसे न येण्यामागे अनेक कारणे असू शकतात. त्यामध्ये तुम्ही फॉर्म भरताना जर तुम्ही काही चुका केल्या असतील तर तुम्हाला पैसे मिळणार नाही. त्याचसोबत तुमचे बँक अकाउंट आणि आधार नंबर लिंक नसेल तरीही पैसे जमा होणार नाही. याचसोबत तुमचे DBT स्टेटस हे ऑन असायला हवे. (Ladki Bahin Yojana)

जर तुम्हालाही पैसे आले नसेल तर तुम्ही ही प्रोसेस करा (If You Did Not Recived Money Then Follow These Process)

जर तुमच्याही अकाउंटला पैसे आले नसतील तर त्याचे कारण DBT Enable नसणे. तुम्हाला त्यासाठी DBT Enable करावे लागेल.हे ऑन करण्यासाठी तुम्हाला npci.org.in वर जाऊन consumer वर क्लिक करा.तिथे तुम्हाला Bharat Aadhar Seeding Enable वर क्लिक करा.त्यानंतर रिक्वेस्ट फॉर आधार सीडींगवर क्लिक करा.

यानंतर आधार मॅप स्टेट्‍सवर क्लिक करा. यानंतर आधार कार्ड टाका.त्यानंतर तुम्हाला कॅप्चा कोड टाका. त्यानंतर तुम्हाला तुमचे DBT Status Enable आहे की नाही दिसेल. जर तुमचे DBT Status Enable नसेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन डिजिटल अकाउंट ओपन करा. त्यानंतर तुमचे DBT Status Enable होईल.

आतापर्यंत लाखो महिलांच्या अकाउंटला पैसे जमा झाले आहेत. काही तांत्रिक कारणांमुळे ज्या महिलांना मागील दोन महिन्याचे पैसे मिळाले नाही त्यांना ४५०० रुपये मिळणार आहे. तसेच ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यात फॉर्म भरले आहेत त्यांना त्या महिन्यापासूनच पैसे मिळणार आहेत. तिसऱ्या हप्त्याचे आतापर्यंत ५२१ कोटी रुपये महिलांच्या अकाउंटला जमा करण्यात आले आहेत. आता सर्व महिलांच्या खात्यात पैसे येतील, असं महिला व बाल कल्याण विभागाने सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Archana Puran Singh: अर्चना पूरन सिंहला झालेला गंभीर CRPS आजार नेमका आहे तरी काय? जाणून घ्या एका क्लिकवर

Maharashtra Live News Update : बीडच्या मयत ऊसतोड मजूर गणेश डोंगरे यांच्या कुटुंबीयांना मिळाला न्याय

Nose Blackheads Removal Tips: नाकावरचे ओपन पोअर्स कसे घालवायचे? घरगुती 4 सोपे उपाय करा

Women Health Care: महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची; स्त्रीरोग तज्ज्ञांनी सांगितलं 'हे' सल्ले

Mumbai Crime : समलैंगिक प्रेमाचा धक्कादायक शेवट! घरी जाण्यास नकार दिला, पार्टनरने छातीत चाकू खुपसला अन्...

SCROLL FOR NEXT