Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचे फोन खणखणले, तिसरा हप्ता खात्यात जमा होण्यास सुरुवात; तुम्हाला मिळाले का?

Ladki Bahin Yojana 3rd Installment: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी ५१२ कोटी रुपये महिलांच्या खात्यावर ट्रान्सफर करण्यात आले आहे.

Siddhi Hande

महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेची संपूर्ण देशभरात चर्चा सुरु आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. या योजनेत जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे दिले आहेत. त्यानंतर आता तिसऱ्या महिन्याचा हप्ता लवकरच जमा केला जाणार आहे.

सप्टेंबर महिन्याचे म्हणजेच तिसऱ्या टप्प्यातील हप्त्याचे वाटप रविवारपासून सुरु झाले आहे, अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.

लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत ३४ लाख ७४ हजार ११६ महिलांना पैसे दिले असल्याचे आदिती तटकरे यांनी सांगितले.या योजनेत ५२१ कोटी रुपयांचा हप्ता जमा करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

लाडकी बहीण योजनेअंतर्गत तिसऱ्या आणि चौथ्या हप्त्यातील पैसे लवकरत महिलांना देण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात होती. २९ सप्टेंबरपासून या योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे वाटप सुरु झाले आहे. या योजनेत सर्व महिलांना पैसे देण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत सर्व महिलांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झाला की नाही कसं चेक करायचं?

लाडकी बहीण योजनेअंतर्गत जुलै आणि सप्टेंबर महिन्याचे पैसे एकत्र जमा केले होते.त्यानंतर ऑगस्ट महिन्यात ज्या महिलांनी फॉर्म भरलेत त्यांना ४५०० दिले आहेत. सप्टेंबर महिन्यात ज्या महिलांनी फॉर्म भरलेत त्यांना किती पैसे देण्यात येणार याबाबत माहिती समोर आलेली नाही. परंतु त्यांना ज्या महिन्यात फॉर्म भरला त्या महिन्यापासून पैसे दिले जातील असं सांगण्यात येत आहे. या योजनेअंतर्ग तुमच्या खात्यात पैसे आलेत की नाही ते ऑनलाइन पद्धतीने चेक करु शकतात. ऑनलाइन बँकिंग अॅपवर जाऊन तुम्ही पैसे जमा झालेत की नाही चेक करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GK: जगातले सर्वाच पहिले धान्य कोणते? जाणून घ्या रोचक माहिती

Lalbaug Visarjan 2025 : लालबाग राजाच्या विसर्जनाला विघ्न, नेमकं कारण काय? वाचा सविस्तर

Heart-Touching Video : बाप्पाला घरी घेऊन चला, पाण्यात सोडू नका, शिवण्याचा बाबाकडे हट्ट, व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

Maharashtra Live News Update: पुणे पोलिस गणपती मंडळांपुढे हतबल

Lalit Prabhakar : 'आरपार'नंतर ललित प्रभाकर हिंदी चित्रपटात झळकणार, सिनेमाचे नाव काय?

SCROLL FOR NEXT