Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: सप्टेंबर महिन्यात फॉर्म, मेसेज आला? आता ४० तासात जमा होणार पैसे

Ladki Bahin Yojana September Month Installment: लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता २९ सप्टेंबर रोजी जमा होणार आहे.

Siddhi Hande

महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ही योजना राबवण्यात आली आहे. या योजनेत जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे पैसे एकत्रित आले आहेत. त्यानंतर आता सप्टेंबर महिन्याचा हप्ता लवकरच महिलांच्या खात्यात जमा केला जाणार आहे.

या योजनेत सप्टेंबर महिन्याचा हप्ता २९ तारखेला जमा केला जाणार आहे. तसेच लाडकी बहीण योजनेत अर्ज करण्यासाठी मुदतवाढ केली जाऊ शकते. ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत अर्ज करण्याची मुदत वाढली जाऊ शकते. (Ladki Bahin Yojana)

सप्टेंबर महिन्यात ज्या महिलांनी अर्ज केला आहे त्यांना पुढच्या ४० तासात म्हणजेच २९ सप्टेंबरला पैसे जमा होणार आहेत. सप्टेंबर महिन्यात ज्या महिलांना अर्ज भरले आहेत त्यांचे अर्ज मंजूर होत आहेत त्याबाबत मेसेज महिलांच्या मोबाईलवर पाठवले जात आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता २९ तारखेला मुलांच्या खात्यात जमा होणार आहे.लाडकी बहीण योजनेत जुलै आणि ऑगस्ट महिन्यात फॉर्म भरलेल्या महिलांना पैसे दिले जाणार आहे. सप्टेंबर महिन्यात अर्ज केलेल्या महिलांना १५०० की ४५०० रुपये मिळणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

लाडकी बहीण योजनेत पैसे आलेत की नाही कसं चेक करावं?

लाडकी बहीण योजनेत पैसे जमा झाल्यानंतर तुमच्या मोबाईलवर बँकेचा मेसेज येईल. तसेच तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने पैसे आले की नाही हे चेक करु शकतात. त्यासाठी तुम्हाला तुमच्या ऑनलाइन बँकिंग अॅपवर जाऊन पैसे आलेत की नाही ते पाहावे लागेल. तसेच ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीमध्येही तुम्हाला पैसे आलेत की नाही हे समजेल. तुमचे पोस्टात अकाउंट असेल तर तिथे जाऊन तुम्ही पासबुकवर एन्ट्री करुन पैसे आलेत की नाही चेक करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gadchiroli Flood: गडचिरोलीत पावसाचा कहर; २५ प्रमुख रस्ते आणि महामार्ग वाहतुकीसाठी बंद

Friday Horoscope: आज कोणत्या राशीचं भाग्य चमकणार? जाणून घ्या तुमच्या आयुष्यात काय बदल घडणार

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

SCROLL FOR NEXT