Maharashtra Ladki Bahin Yojana Saam TV Marathi
बिझनेस

Ladki Bahin Yojana : दिवाळी संपली, लाडक्या बहिणींच्या खात्यात १५०० कधी येणार? ऑक्टोबर हप्त्याबाबत नवीन अपडेट

Ladki Bahin Yojana October installment date : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑक्टोबर महिन्याच्या १५०० रुपयांच्या हप्त्याची प्रतीक्षा कायम आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, नोव्हेंबरअखेरीस २८ ते ३० तारखेदरम्यान महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे.

Namdeo Kumbhar

Ladki Bahin Yojana October 1500 installment date : राज्यभरात दिवाळीचा सण अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. आकाशकंदील, नवे कपडे, फराळ आणि फटाक्यांच्या आतषबाजीने संपूर्ण परिसर उजळून निघाला होता. एकीकडे शहरांमध्ये आनंदाचे वातावरण असताना, दुसरीकडे ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या घरी दिवाळी साजरी झाली खरी, मात्र पावसाने पाठ फिरवल्यामुळे यंदा त्यांच्यासमोर मोठे संकट ओढवले आहे. या पार्श्वभूमीवर, सरकारकडून राज्यातील शेतकऱ्यांना ५,००० रुपयांची अग्रीम मदत देण्यात आली. त्याच काळात राज्य सरकारकडून 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यातही सप्टेंबर महिन्याचा १५०० रूपयांचा हप्ता जमा करण्यात आला. त्यामुळे आता ऑक्टोबर महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता कधी जमा होणार? याची प्रतीक्षा लाभार्थी महिला करत आहेत. याबाबत आता सूत्रांकडून महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

दिवाळीचा सण सुरू होण्याआधी सरकारकडून पात्र महिलांना १५०० रूपयांची मदत देण्यात आली. सप्टेंबर महिन्याचा हप्ता दिवाळीत जमा झाल्यामुळे महिलांना घरखर्चासाठी मोठी मदत झाली. पण नोव्हेंबर महिन्याचे आता २ आठवडे संपत आले. तरीही ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याबाबत अधिकृत माहिती समोर आली नाही.

सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य मंत्रिमंडळाची बैठकीत ऑक्टोबर महिन्याच्या १५०० रूपयांच्या हप्त्याचा निर्णय घेतला जाणार आहे. दिवाळीनंतर आता सोमवारी अथवा मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. त्यामध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे समजतेय.

मंत्रालयातील खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर ऑक्टोबर महिन्याचा १५०० रूपयांचा हप्ता जमा होऊ शकतो. २५ तारखेपर्यंत याबाबतचा जीआर निघाला तर २८ ते ३० या दरम्यान टप्प्या टप्प्याने लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर पैसे जमा होतील. पण जर ३० नोव्हेंबरपर्यंत लाडक्या बहि‍णींना सन्मान निधी मिळाली नाही. तर डिसेंबर महिन्यात दोन महिन्याचे ३ हजार रूपये एकत्र येण्याचा अंदाजही आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपूर ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; १४३ किलो डोडा पावडरसह ३९ लाखांचा मुद्देमाल जप्त

WhatsApp Update : व्हॉट्सअ‍ॅप युजर्ससाठी मोठी बातमी! आता मेसेज फक्त एकदाच पाहता येणार; जाणून घ्या कसं वापरायचं

Shirdi Sai Baba : साईचरणी 94 लाखांचं घड्याळ! 18 कॅरेट सोनं, शुद्ध चांदी

विधानसभा निवडणुकीआधीच 8 आमदारांचं तिकीट कापलं; दुसरी यादी जाहीर, कोणाला मिळाली संधी?

Mhauli Ghat Road: माऊली घाटातून पंढरीचा मार्ग सुकर! ३१ वर्षांची प्रतीक्षा संपणार, वारकऱ्यांसाठी नवा रस्ता होणार तयार

SCROLL FOR NEXT