Jio Home Lone Saam Digital
बिझनेस

Jio Home Loan : मुकेश अंबानी देणार स्वस्त होम लोन, काय आहे मोठा प्लान?

Jio Home Loan Plan : मुकेश अंबानींची एनबीएफसी (NBFC) जिओ फायनान्शिअल सर्विसेस कंपनी लवकरच गृह कर्ज सुरू करण्याची शक्यता आहे. कंपनीकडून यावर कामही सुरू करण्यात आलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी आता देशवासीयांना नवीन सेवा देण्याच्या तयारीत आहेत. लोकांना त्यांच्या स्वप्नातील घर बनवण्यासाठी मदत करणार आहेत. अंबानींची एनबीएफसी (NBFC) जिओ फायनान्शिअल सर्विसेस कंपनी लवकरच गृह कर्ज सुरू करण्याची शक्यता आहे. कंपनीकडून यावर कामही सुरू करण्यात आलं असून काही महिन्यातचं कर्ज प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. मुकेश अंबानी यांनी गेल्या वर्षीच एनबीएफसी जियो फायनान्शिअलची सुरुवात केली होती.

जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसची नॉन बँकिंग वित्तीय कंपनी जिओ फायनान्शिअल सर्विसेसने शुक्रवारी सांगितलं की, गृह कर्ज सुरू करण्यासाटी कंपनी अंतिम टप्प्यात आहे. एका चाचणीच्या स्वरूपात (बीटा) सुरू करण्यात आलं आहे. याशिवाय कंपनी मालमत्तेवर कर्ज आणि रोख्यांवर कर्ज यांसारख्या इतर सेवा देखील देण्याचा विचार करत आहेत.

शुक्रवारी पहिल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (पोस्ट-लिस्टिंग) समभागधारकांना संबोधित करताना, कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हितेश सेठिया यांनी यासंदर्भात माहिती दिली. गृहकर्ज लॉन्च करण्याच्या अंतिम टप्प्यात असून लवकरच सुरू केले जाईल. सध्या चाचणी आधारावर सुरू होत आहे. मालमत्तेवर कर्ज आणि रोख्यांवर कर्ज यासारख्या इतर सेवा देखील देण्यात येणार आहेत. जिओ फायनान्शिअल सर्विसेस लिमिटेडने आधीच पुरवठा साखळी वित्तपुरवठा, म्युच्युअल फंडांवरील कर्ज आणि उपकरणे वित्तपुरवठा करण्यासाठी एंटरप्राइझ सोल्यूशन्स यासारख्या सुरक्षित कर्ज सेवा कंपनीने ग्राहकांना उपलब्ध करून दिलेली आहेत.

शुक्रवारी जिओ फायनान्शिअलच्या शेअर्समध्ये एक टक्क्यांहून अधिक घसरण झाली होती. बीएसईच्या आकडेवारीनुसार, 1.21 टक्क्यांच्या घसरणीसह 321.75 अंकांनर बंद झाला. तसंच ट्रेडिंग सत्रादरम्यान कंपनीच्या समभागांची 320.50 रुपयांपर्यंत घसरण झाली. कंपनीच्या समभागांनी 331.60 रुपयांचा दिवसाचा उच्चांक गाठला. कंपनीचे मार्केट कॅप 2 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT