Gold Silver Today Rate Saam TV
बिझनेस

Gold Rate: महाराष्ट्राच्या सुवर्णनगरीत सोन्याचा भाव घसरला; १ तोळ्याचा आजचा दर किती? वाचा

Gold Price Fall in Jalgaon: जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात पुन्हा एकदा मोठी घसरण झाली आहे. गेल्या २४ तासांत प्रति तोळा सोनं तब्बल १,५०० रुपयांनी स्वस्त झाले आहे.

Bhagyashree Kamble

सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. जळगाव शहरातील सराफा बाजारात पुन्हा एकदा सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. गेल्या २४ तासांत प्रति तोळा सोनं तब्बल १,५०० रूपयांनी स्वस्त झालं आहे. सध्या जीएसटीसह सोन्याचा दर ९४,८०० रूपयांपर्यंत पोहोचला आहे. राज्यात लग्नाचा सिझन सुरू आहे.

काही दिवसांपूर्वी सोन्याचा दर १ लाखांवर पोहोचला होता. यामुळे सराफांच्या दुकानात शुकशुकाट होता. पण आता सोन्याचे दर घसरत असल्यामुळे ग्राहक दागिने खरेदीसाठी सराफांच्या दुकानात गर्दी करत आहेत.

अलिकडेच सोन्याचा दर १ लाखांवर गेला होता. उच्चांक गाठल्यामुळे ग्राहकांनीही सराफाच्या दुकानाकडे पाठ फिरवली होती. मात्र, त्यानंतर सलग काही दिवस सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली. ही घसरण 'गोल्ड इज न्यू करन्सी' टॅरिफ अंमलबजावणीमुळे झाली असावी, अशी माहिती स्थानिक व्यापाऱ्यांनी दिली आहे.

२२ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळा (जीएसटीसह) ९४,८०० रूपये इतका आहे. तब्बल १,५०० रूपयांनी सोनं स्वस्त झालं आहे. लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर सोनं स्वस्त झाल्यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

सराफात बाजारात सोन्याच्या दरात आज मोठी घसरण झाली असल्याचं पाहायला मिळालं आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम २१३० रूपयांनी घसरला आहे. तर, १०० ग्रॅम सोन्याचा दर २१,३०० रूपयांनी घसरला आहे. म्हणजेच १० ग्रॅम तोळ्यासाठी आपल्याला ९४,०८० रूपये मोजावे लागतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weather Update : मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरु होणार, आज 'या' जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस; वाचा हवामानाचा अंदाज

Maharashtra News Live Update: आज दीड दिवसांच्या बाप्पांना आज निरोप दिला जाणार

Accident: भरधाव कंटेनर गणरायाच्या आगमन मिरवणुकीत घुसला, १४ जणांना चिरडलं; २ शेतकऱ्यांनी जागीच सोडले प्राण

Diabetes Diet : काळा की पिवळा, डायबिटीज रुग्णांनी कोणता गुळ खावा? शुगर कंट्रोल ठेवण्यासाठी जाणून घ्या

Tuesday Horoscope : गणेशोत्सवात या 4 राशींचे नशीब पालटणार! पैसा, प्रेम आणि करिअरमध्ये मिळणार मोठा फायदा; आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT