ITR Refund Saam Tv
बिझनेस

ITR Refund: मुदतीनंतर ITR फाइल केला तर रिफंड मिळणार नाही? आयकर विभागाने स्पष्टच सांगितलं

ITR Refund News: अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी नवीन इन्कम टॅक्स विधेयक सादर केले आहे. या नवीन विधेयकात काही बदल करण्यात आला आहे.

Siddhi Hande

काही दिवसांपूर्वी अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी नवीन आयकर विधेयक सादर केले. या विधेयकात अनेक बदल करण्यात आले आहेत. यामध्ये आयटीआर रिटर्नबाबतही नियम आहेत. जर तुम्ही मुदतीपूर्वी आयटीआर फाइल केला नाही तर तुम्हाला रिफंड मिळणार नाही, असं सांगितलं जात आहे. जुना आयकर कायदा १९६१ मध्ये असा कोणताही नियम नव्हता.

करदाते आर्थिक वर्षाच्या ३१ डिसेंबरपर्यंत आयकर रिटर्न फाइल करु शकतात. परंतु त्यानंतर जर तुम्ही आयटीआर रिटर्न केले तर तुम्हाला रिफंड मिळणार नाही. याबाबत अनेक एक्सपर्ट्सने चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या म्हणण्यांनुसार, नवीन इन्कम टॅक्स विधेयकानुसार उशिराने आयटीआर भरला तर तुम्हाला रिफंड मिळणार नाही. हा नियम २०२६-२७ पासून लागू होणार आहे. मात्र, याबाबत अद्याप प्राप्तिकर विभागाने कोणतीही माहिती दिलेली नाही.

याबाबत ऑनलाइन टॅक्स गाइड टॅक्स गुरु यांनी सोशल मिडिया पोस्ट केली आहे. आयकर कलम १९६१ अंतर्गत इन्कम टॅक्स रिटर्न भरायला उशिर केला तर रिफंड दिला जात होता. दरम्यान नवीन आयकर विधेयक २०२५ अंतर्गत नवीन नियम लागू करण्यात आला आहे. ज्यामध्ये तुम्ही जर उशिराने आयटीआर फाइन केला तर कोणताही रिफंड मिळणार नाही. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

याबाबत आता स्वतः आयकर विभागाने माहिती दिली आहे. आयकर रिफंडमध्ये कोणतेही बदल केलेले नाही. आयकर अधिनियम १९६१ अंतर्गत आयकर रिटर्न दाखल केल्यानंतरच करदात्यांना परतावा मिळणार आहे.

आयकर रिटर्न भरण्यासाठी मुदतवाढ करण्यात येणार असल्याच्या चर्चा सध्या होत होत्या. मात्र, या मुदतीमध्ये कोणताही बदल केलेला नाही. जर तुम्ही मुदतीनंतर आयटीआर भरला तर तुम्हाला दंड भरावा लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला रिफंड दिला जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain: मुंबईसह ठाण्यात तुफान पाऊस, राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

कराचीत ५ मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली, २७ जणांचा मृत्यू

Maharashtra Live News Update : नाशिक जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपलं

Chocolate Waffle Recipe : बिस्किटांपासून बनवा चॉकलेट वॉफल, लहान मुलांचा आवडता पदार्थ १० मिनिटांत तयार

10 Hour Work Rule: सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय! १० तासांची शिफ्ट, ५ दिवसांचा आठवडा

SCROLL FOR NEXT