IRCTC Refund Rule Saam tv
बिझनेस

IRCTC चा नवा नियम! तिकीट कॅन्सल केल्यावर तासाभरात मिळेल रिफंड, कसे वाचा सविस्तर

IRCTC Refund Rule : तिकीट बुक करताना आपण IRCTC अॅपचा वापर करतो. बरेचदा तिकीट बुक न होताच पैसे कट होतात. त्यामुळे रिफंड यायला साधारणत: दोन ते तीन दिवस लागतात.

कोमल दामुद्रे

IRCTC New Rule :

भारतात सगळ्यात सोपा आणि सोयीस्कर मानली जाणारी सुविधा म्हणजे रेल्वे. सर्वसामान्यांना परवडणारी आणि लाखो लोकांचा प्रवास सुरळीत करणारी रेल्वे. लांबचा पल्ला गाठण्यासाठी आपण रेल्वे तिकीट बुक करतो.

तिकीट बुक करताना आपण IRCTC अॅपचा वापर करतो. बरेचदा तिकीट बुक न होताच पैसे कट होतात. त्यामुळे रिफंड (refund) यायला साधारणत: दोन ते तीन दिवस लागतात. तुमच्यासोबतही असे होत असेल तर आनंदाची बातमी आहे. IRCTC लवकरच रेल्वे प्रवाशांना खुशखबर देणार आहे.

आता तुम्हाला तुमच्या तिकीटाचे पैसे (Money) १ तासात परत मिळू शकतात. आयआरसीटीसीच्या रिफंड सेवा जलद करण्यासाठी सेंट्रल फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टमसह एकत्रपणे काम करते आहे. ही सेवा लवकरच सुरु होईल असे देखील सांगण्यात आले आहे.

याच्या माध्यमातून तिकीट रद्द केल्यास तुम्ही तिकीट बुक न करताही पैसे कापले गेले असतील तर तासाभरात तुम्हाला रिफंड मिळेल. सध्या याची प्रक्रिया संथ आहे. त्यामुळे रिफंड यायला २ ते ३ तास लागतात. सगळ्यात आधी IRCTC बँकेत तुमचा रिफंड पाठवते त्यानंतर बँक खात्यात ट्रान्सफर करते. मिंट रिपोर्टनुसार सर्व्हिस रेल्वे अथॉरिटी बदलण्याचे काम करत आहे. IACTC आणि सेंट्रल फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टमची टीम या सेवेत सुधारणा करत आहे.

1. नियम काय?

रेल्वेच्या सध्याच्या नियमांनुसार जर तुमचे तिकीट वेटिंग लिस्टमध्ये असेल आणि ते कन्फर्म झाले नसेल तर रिफंडचे पैसे तुम्हाला सहज मिळतील. त्याच वेळी रेल्वेचे कन्फर्म तिकीट कॅन्सल केल्यास त्याचे चार्जेसही कट होतात. जर तुमची ट्रेन सुटली असेल आणि प्रवास केला नसेल तर तुम्हाला टीडीआर दाखल करावा लागेल. टीडीआर दाखल केल्यानंतर रेल्वे विभाग त्याची पडताळणी करुन रिफंड करते. ट्रेन सुटण्याच्या चार तास आधी तिकीट रद्द केले नाही किंवा TDR दाखल केला नाही तर तुम्हाला रिफंड मिळणार नाही.

2. ३० मिनिटांचा नियम

IRCTC कडून रिफंड हवा असेल तर तुम्हाला तिकीट रद्द करावे लागेल. ट्रेन सुटण्याच्या ३० मिनिटांआधी टीडीआर दाखल करावा लागेल. असे न केल्यास तुम्हाला पैसे मिळणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nitin Gadkari Case : नितीन गडकरींना धमकी, १०० कोटी खंडणीची मागणी; दोघांना ५ वर्षे तुरुंगवास

MSRTC Fare: एसटी बसचा प्रवास आणखी महागणार? परिवहन मंत्र्यांनी दिले तिकीट दरवाढीचे संकेत

IPS Officer Transfer: सातपुते, कृष्ण प्रकाश अन् मुंडेंसह २४ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात खळबळ

Buldhana Crime: बुलडाणा हादरले! नवऱ्याकडून बायकोची हत्या, कुऱ्हाडीने वार करत जागीच संपवलं

Maharashtra News Live Update: - केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यापोस्टरची जाळपोळ... नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी युवक काँग्रेस आक्रमक..

SCROLL FOR NEXT