Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: शाळेत गोल्ड मेडल, सिविल इंजिनियरिंग केलं,नंतर UPSC क्रॅक; IPS सृष्टी गुप्ता यांचा प्रवास

Success Story of IPS Srishti Gupta: आयपीएस सृष्टी गुप्ता या निर्भीड अधिकाऱ्यांपैकी एक आहेत. त्यांनी नोकरी सोडून यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. खूप मेहनतीने त्यांनी यूपीएससी परीक्षा पास केली.

Siddhi Hande

निर्भीड आयपीएस अधिकारी सृष्टी गुप्ता

आधी इंजिनियरिंग केलं नंतर यूपीएससी दिली

नोकरी सोडून आयपीएस होण्याचे स्वप्न केले पूर्ण

स्पर्धा परीक्षा देण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. तुम्हाला ११-१२ तास अभ्यास करावा लागतो. अनेकांना या प्रवासात अपयश येते परंतु कितीही अपयश आले तरीही प्रयत्न करायचे. असंच काहीसं सृष्टी गुप्ता यांनी केलं. त्या त्यांच्या निर्भीड आणि बेधडक स्वभावामुळे चर्चेत असतात. त्यांचा यूपीएससीचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.

सृष्टी गुप्ता या एका प्रायव्हेट कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करत होत्या. त्यानंतर त्यांनी यूपीएससी देण्याचा निर्णय घेतला.

आयपीएस सृष्टी गुप्ता यांनी १९९२ ते २०१२ पर्यंत दिल्लीतील पब्लिक स्कूलमधून शिक्षण घेतले. यानंतर त्यांनी जेईई परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. त्यांना दिल्लीतील टॉप कॉलेजमध्ये अॅडमिशन घेतलं. त्यांनी सिविल इंजिनियरिंगमध्ये बीटेक केले.

सृष्टी यांना शाळेत गोल्ड मेडल मिळाले होते. त्या लहानपणापासूनच अभ्यासात खूप हुशार होत्या. सिविल इंजिनियरिंगनंतर त्यांनी नोएडातील एका कंपनीत इंटर्नशिप केली.

सृष्टी यांनी पाच वर्षे यूपीएससी परीक्षेची तयारी केली. त्यांना या काळात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. तरीही त्यांनी हार मानली नाही. २०२० मध्ये त्यांनी यूपीएससी परीक्षेत १७१ रँक प्राप्त केली आणि त्यांनी १७१ रँक प्राप्त केली. त्यांनी सुरुवातीला एएसपी म्हणून काम केले. त्यानंतर त्या डीएसपी झाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ACB ची धाड

IAS Transfer : मोठा प्रशासकीय फेरबदल! २७ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती? वाचा

Gram Panchayat: ग्रामीण राजकारणात बदल! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सरपंचांचे अधिकार संपले?

विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ! केसीआर यांच्या मुलासह २२ आमदारांचे निलंबन, राजकीय वर्तुळात खळबळ

Myopia in children: मोबाईल-टॅबलेटच्या अतिवापरामुळे मुलांच्या डोळ्यांवर गंभीर परिणाम? पालकांनी ‘ही’ लक्षणं अजिबात दुर्लक्ष करू नयेत

SCROLL FOR NEXT