Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: अभ्यासाचा ताण, आत्महत्येचा विचार, जिद्दीने तयारी केली अन् IPS झाला, अमित लोढा यांचा प्रेरणादायी प्रवास

Success Story of IPS Amit Lodha: आयपीएस अमित लोढा यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी क्रॅक केली आहे. ते देशातील सर्वात डॅशिंग आयपीएस अधिकाऱ्यांपैकी एक आहेत.

Siddhi Hande

यूपीएससी ही देशातील सर्वात अवघड परीक्षा असते. यूपीएससी परीक्षा देऊन तुम्ही आयपीएस आयएएस अधिकारी होऊ शकतात. आयपीएस अमित लोढ यांनीदेखील पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे. त्यांनी खूप मेहनतीने हे यश मिळवले आहे.

अमित लोढा यांच्या आयुष्यात एक वेळ अशी येते की, जेव्हा ते डिप्रेशनचे शिकार झाले होते. त्यांना आत्महत्या करण्याचीदेखील इच्छा झाली होती. परंतु त्यांनी या सर्व विचारांना मागे टाकून यश मिळवले. यामुळेच ते आज आयपीएस अधिकारी आहेत.

अमित लोढा (IPS Amit Lodha) यांनी आयआयटी दिल्ली येथून शिक्षण घेतले. त्याचवेळी त्यांना नैराश्याचा सामना करावा लागला. गणित विषयात त्यांना नेहमी कमी गुण मिळत होते. यामुळेच त्यांना अनेक अडचणी आल्या. त्यामुळेच ते डिप्रेशनमध्ये जात होते. त्यांचे अभ्यासात लक्ष्य लागत नव्हतं. परंतु त्यांनी हार मानली नाही. स्वतः वर विश्वास ठेवला आणि यश मिळवले.

आत्मविश्वाने मिळवलं यश

त्यांनी स्वतः वर विश्वास ठेवला आणि खूप मेहनत केली. अमित यांनी यूपीएससी (UPSC) परीक्षेची तयारी केली. त्यांनी यूपीएससी परीक्षेसाठी गणित हा मुख्य विषय निवडला. ज्या विषयात त्यांना खूप कमी गुण मिळायचे तो विषय त्यांनी निवडला. त्यांनी खूप चांगले गुण नव्हे तर रँकदेखील प्राप्त केली. त्यांच्या आत्मविश्वासामुळे त्यांना हे यश मिळालं आहे.

आयपीएस अमित यांचे शिक्षण (IPS Amit Lodha Education)

आयपीएस अमित लोढा यांनी सेंट झेवियर्स स्कूल जयपूर येथून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यांची एक डॅशिंग आयपीएस म्हणून ओळख आहे. त्यांनी यूपीएससी परीक्षेसाठी एक शेड्युल बनवले होते आणि तेच फॉलो केले.

अमित लोढा यांनी १९९५ मध्ये शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर १९९८ मध्ये त्यांनी आयपीएस म्हणून जॉइन केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sugar Free Barfi Recipe : मधुमेही रुग्णांसाठी शुगर फ्री बर्फी, आताच नोट करा रेसिपी

Maharashtra Politics: पुण्यात काँग्रेसला खिंडार! थोपटे, धंगेकरांनंतर आणखी एका बड्या नेत्याने सोडली साथ, भाजपचे कमळ घेणार हाती

Maharashtra Live News Update: संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा पुणे जिल्ह्यात दाखल

Solapur : सोलापुरात मोठा राडा; मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, नेमकं काय घडलं? VIDEO

Beed Narayangad: महंत शिवाजी महाराजांचा नारायणगडाच्या ट्रस्टींवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप|VIDEO

SCROLL FOR NEXT