MF SIP Saam Tv
बिझनेस

Best SIP Plans: मुलांच्या शिक्षणासाठी पैसे जमा करायचे आहेत, येथे गुंतवा 4 हजार रुपये; मिळू शकतात 52.7 लाख...

Mutual Fund SIP News: मुलांच्या शिक्षणासाठी पैसे जमा करायचे आहेत, येथे गुंतवा 4 हजार रुपये; मिळू शकतात 52.7 लाख...

साम टिव्ही ब्युरो

SIP Calculator: मुले जन्माला आल्यानंतर त्यांच्या शिक्षणाची पालकांना फार पूर्वीपासून काळजी वाटू लागते. अशा परिस्थितीत पालक आपल्या मुलांना चांगले भविष्य देण्यासाठी कमाईसोबतच काही पैसे वाचवू लागतात. हे लक्षात घेण्यासारखे आहे की बहुतेक लोक त्यांची बचत मुदत ठेव योजना किंवा कोणत्याही सुरक्षित गुंतवणूक पर्यायांमध्ये गुंतवण्यास प्राधान्य देतात.

या गुंतवणुकीच्या क्षेत्रांत चांगला परतावा मिळत नाही. अशा परिस्थितीत चांगला परतावा मिळविण्यासाठी तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये एसआयपी करून तुमची बचत गुंतवू शकता. गेल्या काही वर्षांत अनेक म्युच्युअल फंड योजनांनी चांगला परतावा देण्याचे काम केले आहे. हे क्षेत्र बाजाराच्या जोखमीच्या अधीन आहे, परंतु येथून परतावा मिळण्याची शक्यता चांगली आहे.

अशातच तुम्ही तुम्ही फक्त 4 हजार रुपये गुंतवून 52.7 लाख रुपये जमा करू शकतात. कसं.., तर तुम्हाला चांगल्या म्युच्युअल फंड योजनेत एसआयपी करावी लागेल. त्यानंतर तुम्हाला संपूर्ण 20 वर्षे दरमहा 4 हजार रुपये गुंतवावे लागतील. (Latest Marathi News)

याशिवाय तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर दरवर्षी अंदाजे 14 टक्के परतावा मिळेल, अशी अपेक्षा करावी लागेल. अशातच 20 वर्षांनंतर मॅच्युरिटीच्या वेळी तुम्ही सहजपणे 52.7 लाख रुपये जमा करू शकाल.

महत्वाची नोंद: म्युच्युअल फंडात गुंतवलेले पैसे बाजाराच्या जोखमीच्या अधीन असतात. यामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. जर तुम्ही कोणतीही माहिती न घेता म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली, तर तुम्हाला मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. म्युच्युअल फंडात केलेल्या गुंतवणुकीवर मिळणारा परतावा बाजाराच्या व्यवहारावर ठरत असतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Frequently Headache Problem: तुम्हालाही सतत डोकेदुखीचा त्रास आहे का? जाणून घ्या यामागची छुपी कारणे आणि घरगुती उपाय

Maharashtra News Live Update: सुप्रिया सुळे यांनी आंदोलन करणाऱ्या मुलींशी फोनवरून साधला संवाद

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत शिंदेंची मोठी घोषणा, मुख्यमंत्र्यांसमोरच स्पष्ट केली भूमिका

इंजिनिअरसह अख्ख्या कुटुंबाची गोदावरी नदीत उडी; 5 जणांच्या हत्येप्रकरणी कोचला अटक

Prajakta Mali Photos: प्राजक्ता माळीचे टॉप 10 फोटो, जे तुम्ही कधीच पाहिले नसतील

SCROLL FOR NEXT