Government Schemes Saam Tv
बिझनेस

Government Schemes: दिवाळीत या सरकारी योजनेत करा 5,000 रुपयांची गुंतवणूक, काही वर्षांत मिळणार 16.27 लाख; वाचा सविस्तर माहिती

PPF Investment: या दिवाळीत तुम्ही जर चांगली गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

Satish Kengar

दिवाळीला आता अवघे काही दिवस उरले आहेत. यातच आज आम्ही तुम्हाला सरकारच्या एका अतिशय चांगल्या योजनेबद्दल सांगणार आहोत, जिथे तुम्ही फक्त पाच हजार रुपये गुंतवून काही वर्षांत 16.27 लाख रुपये मिळवू शकता. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर, तुमचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्यासाठी तुम्ही या योजनेत गुंतवणूक करू शकता. आज आम्ही तुम्हाला ज्या योजनेबद्दल सांगणार आहोत त्याचे नाव आहे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना (PPF).

या योजनेत गुंतवणूक केल्याने तुम्हाला अनेक फायदे मिळतात. सध्या या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला 7.1 टक्के व्याज मिळेल. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना देशात खूप लोकप्रिय आहे. याच योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया...

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजनेत तुम्हाला तुमची बचत 15 वर्षांसाठी गुंतवावी लागेल. 15 वर्षांचा मॅच्युरिटी कालावधी संपल्यानंतर, तुम्ही तुमचा गुंतवणुकीचा कालावधी आणखी पाच वर्षांसाठी वाढवू शकता.

या योजनेत तुम्ही किमान 500 रुपये आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये वार्षिक गुंतवू शकता. जर तुम्हाला एखाद्या चांगल्या योजनेत दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करायची असेल, तर ही योजना तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरू शकते.

याच्या गुंतवणुकीचे गणित समजून घेऊया, ज्याच्या मदतीने तुम्ही 5,000 रुपये गुंतवून काही वर्षांत 16.27 लाख रुपये जमा करू शकता. यासाठी सर्वातआधी तुम्हाला पीपीएफ योजनेत खाते उघडावे लागेल.

पीपीएफ योजनेत खाते उघडल्यानंतर तुम्हाला दरमहा 5,000 रुपये वाचवावे लागतील आणि या योजनेत वार्षिक 60,000 रुपये गुंतवावे लागतील. तुम्हाला ही गुंतवणूक एकूण 15 वर्षांसाठी करावी लागेल. जर तुम्ही सध्याच्या 7.1 टक्के व्याज दराने गणना केली तर तुमच्याकडे मुदतपूर्तीच्या वेळी 16,27,284 रुपये असतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अहिल्यानगर शहरातील जैन समाजाची जमीन संग्राम जगताप यांनी हडप केल्याचा आरोप

Parth Pawar: पार्थ पवारांवर १८०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप, मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

Solapur News : सोलापूरमध्ये धक्कादायक घटना! विमानाच्या पंखात अडकला पतंगाचा मांजा, थोडक्यात दुर्घटना टळली

Famous Influencer Death : प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरचं निधन; ३२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, नेमकं कारण काय?

Vande Bharat Express : देशात १८६ वंदे भारत एक्सप्रेस धावतात, महाराष्ट्रात संख्या किती? वाचा

SCROLL FOR NEXT