Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: लहानपणीच दृष्टी गेली, पण जिद्द नाही सोडली, एकदा नव्हे तर दोनदा क्रॅक केली UPSC; महाराष्ट्राची लेक प्रांजली पाटील यांची यशोगाथा

Success Story Of IAS Pranjali Patil: प्रांजली पाटील या देशातील पहिल्या अंध आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी कोणत्याही कोचिंग क्लासेसशिवाय एकदा नव्हे तर दोनदा यूपीएससी परीक्षा क्रॅक केली.

Siddhi Hande

आयुष्यात प्रत्येकालाच संघर्ष करावा लागतो. प्रत्येकाला आपला संघर्ष हा खूप मोठा वाटतो. परंतु आपल्यापेक्षाही खडतर परिस्थितीतून जाणारे कोणीतरी असतं. परंतु ते लोक न खचत आपले स्वप्न पूर्ण करतात. दृढ निश्चय,मेहनत आणि इच्छाशक्तीच्या जोरावर यश मिळवतात. असंच यश आयएएस प्रांजल पाटील यांनी मिळवलं आहे. (Success Story)

आयएएस प्रांजल पाटील यांना प्रवास सोपा नव्हता. अनेक अडचणींवर मात करुन त्यांनी मोठे यश मिळवले आहे. प्रांजल पाटील या अंध आहेत. त्या देशातील पहिल्या आयएएस अधिकारी आहेत ज्यांना दिसत नाही. त्यांनी दृष्टी नसतानाही प्रयत्न केले आणि त्यात यश मिळवले.

प्रांजल यांचा प्रवास हा सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. प्रांजल यांनी २०१६ मध्ये पहिल्यांदा यूपीएससी परीक्षा दिली.त्यात त्यांना ७४४ रँक मिळाली. परंतु त्यांना आयएएस अधिकारी व्हायचे होते. त्यांनी पुन्हा यूपीएससी परीक्षा दिली. यावेळी त्यांनी १२४वी रँक मिळवली. (IAS Pranjali Patil Success Story)

प्रांजल यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी करण्यासाठी कोणत्याही कोचिंग क्लासेसची मदत घेतली नाही. त्यांनी परीक्षेच्या तयारीसाठी एक विशेष सॉफ्टवेयर तयार केला होता. ज्यात पुस्तके वाचली जायची. त्यामुळे जरी दृष्टी नसली तरीही कानाने ऐकून त्यांनी परीक्षेचा अभ्यास केला. (Indias First Blind IAS Officer )

प्रांजल या मूळच्या महाराष्ट्रातील उल्हासनगरच्या रहिवासी. लहानपणीच त्यांनी दृष्टी गेली. परंतु त्यांनी या परिस्थितीशी दोन हात केले. त्यांनी मुंबईतील कमला मेदत दादर स्कूल फॉर द ब्लाइंड या शाळेतून शिक्षण घेतले. त्यानंतर सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये पॉलिटिकल सायन्समधून ग्रॅज्युएशन पूर्ण केले. त्यानंतर पीएचडी केली.

२०१७ मध्ये त्यांनी यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. २०१८ मध्ये त्यांनी सहाय्यक कलेक्टर म्हणून नियुक्ती झाली. महाराष्ट्राच्या प्रांजल पाटील यांचा प्रवास खूप जास्त प्रेरणादायी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT