Petrol Price Increase Maharashtra meta ai
बिझनेस

Petrol Price Hike : मोठी बातमी! पेट्रोल ५ रुपयांनी तर डिझेल ३ रुपयांनी महागले; 'या' पंपांवर वाढले दर

Petrol Price Increase Maharashtra : पेट्रोलच्या दरात ५ रुपये आणि डिझेलच्या दरात ३ रुपये प्रति लिटर वाढ केली आहे. काही पंपावर डिझेल खरेदीच्या मर्यादेचीही चर्चा सुरू आहे.

Sakshi Sunil Jadhav

सर्वसामान्यांच्या खिशाला आता कात्री लागणार आहे. जागतिक पातळीवर ऊर्जा बाजारात निर्माण झालेल्या तणावाचा परिणाम आता भारतातल्या पेट्रोल-डिझेलच्या दरांवर दिसू लागला आहे. देशातल्या प्रमुख खासगी इंधन विक्रेती कंपनी नायरा एनर्जीने पेट्रोलच्या किंमतीत ५ रुपये आणि डिझेलच्या किंमतीत ३ रुपये प्रति लिटरने वाढ केली आहे. ही दरवाढ तत्काळ लागू करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, देशभरात सुमारे ७,१०८ पेट्रोल पंपांचं संचालन करणाऱ्या नायरा एनर्जीने शनिवारी पहाटेपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवल्या. या दरवाढीबाबत कंपनीच्या प्रवक्त्यांकडे प्रतिक्रिया मागण्यात आली होती. मात्र त्यांच्याकडून तत्काळ उत्तर मिळालं नाही.

याआधीही आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यानंतर नायरा एनर्जीने इंधन दरात वाढ केली होती. २६ मार्च रोजी कंपनीने पेट्रोल ५ रुपये आणि डिझेल ३ रुपये प्रति लिटर महाग केले होते. त्यानंतर सार्वजनिक क्षेत्रातल्या तेल कंपन्यांनीही मे महिन्यात इंधनाच्या दरात वाढ करण्यात सुरुवात केली होती. मात्र नंतर नायराने ही दरवाढ मागे घेतली होती. पश्चिम आशियातला तणाव कमी झाल्यानंतर कच्च्या तेलाच्या किंमती नरमल्याने १ जुलै रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी अनुक्रमे ५ आणि ३ रुपयांची कपात करण्यात आली होती.

डिझेल विक्रीच्या मर्यादेवरूनही चर्चा

दरम्यान, काही पेट्रोल पंपावर डिझेल खरेदीवर मर्यादा घालवण्यात आल्यानेही चर्चा सुरू आहे. पेट्रोलियम सचिव नीरज मित्तल यांनी पेट्रोल-डिझेलच्या विक्रीवर कोणतीही मर्यादा घालण्यास सरकारची परवानगी नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

रिटेल आणि घाऊक डिझेलच्या किमतीतला फरक वाढल्याने कारखाने, दूरसंचार कंपन्या, हॉटेल्स आणि रुग्णालयांसारखं मोठं ग्राहक स्वस्त दरातील डिझेलसाठी पेट्रोल पंपाकडे वळत आहेत. काही ठिकाणी हे ग्राहक एकावेळी ४०० ते ६०० लिटरपर्यंत डिझेल खरेदी करत असल्याने पंपांच्या साठ्यावर दबाव निर्माण होत आहे.

त्यामुळे जिओ-बीपीने काही पंपांवर एका ग्राहकासाठी दररोज ५० लिटरपर्यंत डिझेल खरेदीची मर्यादा लागू केली आहे. तर नायरा एनर्जीच्या काही पंपांवर ही मर्यादा ७० ते २०० लिटर इतकी असल्याची माहिती समोर आली आहे.

पेट्रोलचा भाव

मुंबईतील आजचा पेट्रोलचा भाव - ₹111.21

नाशिकमधील आजचा पेट्रोलचा भाव - ₹112.44

पुण्यातील आजचा पेट्रोलचा भाव - ₹111.90–112.02

दिल्लीतील आजचा पेट्रोलचा भाव- ₹102.12

चेन्नईतील आजचा पेट्रोलचा भाव - ₹107.76

डिझेलचा भाव

मुंबईतील आजचा डिझेलचा भाव - ₹97.83

नाशिकमधील आजचा डिझेलचा भाव - ₹99.05

पुण्यातील आजचा डिझेलचा भाव - ₹98.68

दिल्लीतील आजचा डिझेलचा भाव - ₹95.20

चेन्नईतील आजचा डिझेलचा भाव - ₹99.55

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Banana : केळी खाल्ल्यानंतर किती लिटर पाणी प्यावे? ९०% टक्के लोक करतात ही चूक, आताच घ्या जाणून

राजकारणात खळबळ! माजी मुख्यमंत्र्यांना जोरदार झटका; माजी आमदारासह महत्वाच्या ३ नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Maharashtra News Live Update: सलगच्या सुट्ट्यांचा परिणाम! रायगडचे समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलले

चारित्र्याच्या संशयावरून नराधम पतीची पत्नीला बेदम मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू, दोन मुलांच्या डोक्यावरचं मायेचं छत्र हरपलं

Downhill driving tips: उताराच्या रस्त्यावर कार न्यूट्रलवर चालवल्याने पेट्रोलची बचत होते?

SCROLL FOR NEXT