Railway Ticket News  AI image
बिझनेस

Train Ticket : तुमच्या नावाच्या तिकीटावर दुसरा व्यक्ती करू शकणार प्रवास, रेल्वे विभागाचा नवा नियम

Railway Train Ticket News : रेल्वे प्रवास रद्द झाला तरी कन्फर्म तिकीट वाया जाणार नाही! भारतीय रेल्वेच्या नियमानुसार आई-वडील, भाऊ-बहीण, पती-पत्नी यांच्यासह कुटुंबीयांच्या नावावर तिकीट ट्रान्सफर कसे करू शकतो.

Alisha Khedekar

रेल्वेने प्रवास करण्याचा प्लॅन केला आणि ऐनवेळी काही कारणामुळे प्रवास रद्द करावा लागला, तर अनेकदा कन्फर्म तिकीट वाया जाण्याची भीती असते. अशा परिस्थितीत रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची सुविधा उपलब्ध आहे. भारतीय रेल्वेच्या नियमांनुसार, प्रवासी आपले कन्फर्म तिकीट दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर ट्रान्सफर करू शकतात. त्यामुळे स्वतःला प्रवास करता येत नसल्यास कुटुंबातील दुसरी व्यक्ती त्याच तिकिटावर प्रवास करू शकते. मात्र, यासाठी रेल्वेने काही नियम आणि अटी ठरवून दिल्या आहेत.

कोणाच्या नावावर करता येणार तिकीट ट्रान्सफर

रेल्वेच्या नियमानुसार, कन्फर्म तिकीट केवळ जवळच्या कुटुंबीयांच्या नावावर करता येते. यामध्ये आई, वडील, भाऊ, बहीण, मुलगा, मुलगी, पती आणि पत्नी यांचा समावेश आहे. म्हणजेच प्रवास करणे शक्य नसल्यास संबंधित व्यक्ती आपल्या कुटुंबातील सदस्याला तिकीट देऊ शकते.

तिकीट ट्रान्सफर करण्यासाठी किती वेळ आधी अर्ज करावा

तिकिटावरील नाव बदलण्यासाठी प्रवाशाला संबंधित रेल्वे स्थानकावरील आरक्षण कार्यालयात जाऊन लेखी अर्ज करावा लागतो. हा अर्ज गाडी सुटण्याच्या नियोजित वेळेच्या किमान २४ तास आधी करणे आवश्यक आहे. अर्जासोबत मूळ प्रवासी आणि ज्या व्यक्तीच्या नावावर तिकीट ट्रान्सफर करायचे आहे, त्या दोघांचे अधिकृत ओळखपत्र आणि आवश्यक कागदपत्रे द्यावी लागतात.

इतर कोणाला मिळू शकतो या सुविधेचा लाभ?

रेल्वेने शैक्षणिक संस्थेच्या प्रमुखांच्या लेखी परवानगीने एका विद्यार्थ्याच्या जागी दुसऱ्या विद्यार्थ्याचे नाव टाकता येते. यासाठी गाडी सुटण्याच्या किमान ४८ तास आधी अर्ज करावा लागतो. तसेच अनेकदा लग्नासाठी एकत्र प्रवास करणाऱ्या ग्रुपमधील एखाद्या व्यक्तीच्या जागी दुसऱ्या व्यक्तीचे नाव टाकायचे असल्यास समूहाच्या प्रमुखाला ४८ तास आधी अर्ज करता येतो. याव्यतिरिक्त सरकारी कामासाठी एखाद्या कर्मचाऱ्याला प्रवास करता येत नसेल आणि त्याच्या जागी दुसऱ्या कर्मचाऱ्याची नियुक्ती झाली, तर संबंधित अधिकाऱ्याच्या लेखी परवानगीने तिकिटावरील नाव बदलता येते. त्यामुळे प्रवासाच्या शेवटच्या क्षणी काही अडचण निर्माण झाली, तर तिकीट पूर्णपणे वाया जाण्याऐवजी या सुविधेचा उपयोग होऊ शकतो. मात्र, तिकीट ट्रान्सफर करण्यापूर्वी रेल्वेचे नियम, अर्जाची मुदत आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती घेणे महत्त्वाचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips : भूक नसतानाही सारखं काहीतरी खावंसं वाटतंय? या क्रेव्हिंग्स मागचं कारण जाणून घ्या

EPFO New Rules: आता पीएफ खात्यातून ९० टक्के रक्कम काढू शकता, पण असतील 'या' अटी

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची मोठी कारवाई! बड्या नेत्याचा घेतला तडकाफडकी राजीनामा; राज्याच्या राजकारणात खळबळ

NASA Research : चंद्रावरही होणार बटाट्याची शेती, शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांना मोठं यश, हा प्रयोग नेमका आहे तरी काय?

Samantha Ruth Prabhu: समांथा रुथ प्रभू वयाच्या ३९ व्या वर्षी झाली आई; अभिनेत्रीच्या घरी गोंडस मुलाचे आगमन

SCROLL FOR NEXT