Indian Railways Rules Change Saam tv
बिझनेस

Indian Railways: रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! 1 एप्रिलपासून बदलणार 'हा' विशेष नियम

Indian Railways Rules Change: देशभरात लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. रेल्वेने प्रवास करणे जेवढे बजेटमध्ये आहे तेवढेच आरामदायी मानले जाते. अशातच १ एप्रिलपासून भारतीय रेल्वेशी संबंधित एक नियम बदलणार आहे.

साम टिव्ही ब्युरो

Indian Railways Rules Change:

देशभरात लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. रेल्वेने प्रवास करणे जेवढे बजेटमध्ये आहे तेवढेच आरामदायी मानले जाते. अशातच १ एप्रिलपासून भारतीय रेल्वेशी संबंधित एक नियम बदलणार आहे.

१ एप्रिलपासून रेल्वे प्रवाशांना काही नवीन सुविधा देण्यात येणार आहेत. हा नवा बदल पेमेंटशी संबंधित आहे. एप्रिल महिन्यापासून रेल्वे प्रवाशांच्या ऑनलाइन पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी QR कोड स्कॅनिंगची सुविधा सुरू करत आहे.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तिकीट काउंटरवर करता येईल ऑनलाइन पेमेंट

अनेकदा प्रवाशांना तिकीट खरेदी करताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. तिकीट खरेदी करताना पेमेंटशी संबंधित समस्या निश्चितपणे उद्भवतात. आता प्रवाशांना रेल्वे स्थानकावरील तिकीट काउंटरवरून तिकीट खरेदी करताना QR कोड स्कॅन करण्याचा पर्याय मिळणार आहे. गुगल पे आणि फोन पे सारख्या UPI ॲप्सद्वारे प्रवासी त्यांच्या सोयीनुसार पेमेंट करू शकतील.  (Latest Marathi News)

तिकीट काउंटरसोबतच पार्किंग आणि फूड काउंटरवर क्यूआर कोडची सुविधाही उपलब्ध असेल. आता प्रवाशांना क्यूआर कोड स्कॅन करून ऑनलाइन पेमेंट करता येणार आहे. मात्र, अनेक स्थानकांवर ही सुविधा आधीच उपलब्ध करून दिली जात आहे.

दंडही ऑनलाइन भरता येणार

अनेकदा काही लोक विना तिकीट ट्रेनमधून प्रवास करतात आणि पकडले जातात. यानंतर त्यांना दंड भरावा लागतो. आता प्रवाशांना ऑनलाइन प्रक्रियेद्वारे दंडही भरता येणार आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांकडे हँडहोल्ड टर्मिनल मशीन असेल, ज्याद्वारे या डिव्हाइसमध्ये QR कोड दिसेल. QR कोड स्कॅन करून दंड ऑनलाइन भरता येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Red Chilli Benefits : लाल मिरचीचे गुप्त आरोग्यदायी गुण; जाणून घ्या निरोगी आरोग्याचं गुपित

Maharashtra Live News Update: नोएडा, उत्तर प्रदेशातील अनेक भागांत पावसाने लावली हजेरी

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

IPS Anjana Krushna: IPS अंजना कृष्णा याचं काय चुकलं? ठाकरेंच्या नेत्याचा अजित पवारांना सवाल

Red Fort History: ऐतिहासिक लाल किल्ल्याचे बांधकाम किती दिवसांमध्ये पूर्ण झाले?

SCROLL FOR NEXT