Railway Waiting List Tickets Saam Tv
बिझनेस

Railway Waiting List Tickets : तिकीट कन्फर्म झाले आहे की, नाही कसे ओळखाल? RSWL, CKWL चा नेमका अर्थ काय ?

Confirm Ticket : तिकीट बुक झाल्यानंतरही बरेचदा आपल्याला ते वेटिंग लिस्टमध्ये दाखवते.

कोमल दामुद्रे

Railway Confirm Ticket : भारतीय ट्रेनमधून प्रवास करणे अधिक कठीण आहे. तिकीट कन्फर्म नसताना प्रवास करणे अधिक कठीणच. प्रवास सुखकर करण्यासाठी आपण आधीच तिकीट बुक करु शकतो. तिकीट मिळवण्यासाठी आपल्याला अधिकच कसरत करावी लागते.

भारतीय रेल्वेच्या नियमानुसार अशा अनेक गोष्टी आहेत ज्या प्रवाशांना माहीत नसतात. तिकीट बुक झाल्यानंतरही बरेचदा आपल्याला ते वेटिंग लिस्टमध्ये दाखवते. तसेच त्यावर RSWL, CKWL सारखे कोडही दिसतात परंतु, याचा नेमका अर्थ काय याबाबत बऱ्याच प्रवांशाना माहीत नसते. जाणून घेऊया त्याबद्दल

1. कसे कळेल तिकीट कन्फर्म झाले आहे की नाही ?

भारतीय रेल्वेमध्ये (Railway) अनेक प्रकारचे वेटिंग तिकिट आहेत. भारतीय रेल्वेच्या तिकिटावर काही कोड लिहिलेले असतात. या कोडच्या मदतीने तुम्ही तुमचे तिकीट कन्फर्म झाले आहे की, नाही हे तपासू शकता. त्यामुळे चार्ट तयार होण्यापूर्वीच, तुमचे तिकीट कन्फर्म झाले आहे की, नाही हे कळेल. यासाठी तुम्हाला तिकिटावर असलेला कोड अतिशय काळजीपूर्वक पहावा लागेल. तिकिटावर QNWL, PQWL, RSWL, CKWL असे कोड (Code) लिहिलेले असतात. या कोड्सचा अर्थ काय हे जाणून घेऊया

2. RSWL चा अर्थ काय आहे?

या कोडचा अर्थ रोड साइड स्टेशन वेटिंग लिस्ट आहे. याचा अर्थ असा की, एखाद्या व्यक्तीने ट्रेनच्या सुरुवातीच्या स्टेशनपासून ते शेवटच्या किंवा स्टेशनपर्यंत तिकीट बुक केले असेल, तेव्हा हा कोड तिकीटावर लिहिला जातो. अशावेळी हे तिकीट वेटिंग लिस्टमध्ये असेल तर ते कन्फर्म होण्याची शक्यता कमीच असते.

3. CKWL चा अर्थ काय आहे?

जे तिकीट तत्काळ मध्ये घेतले जाते आणि कन्फर्म झाले नाही ते CKWL ला जाते. तत्काळ तिकीट बुक करताना तिकीटांची संख्या कमी असते. तर दुसरीकडे, तत्काळपूर्वी तिकीट बुक करताना तिकीटांची संख्या खूप जास्त असते. म्हणूनच तत्काळ तिकीट कन्फर्म (Confirm) होण्याची शक्यता फारच कमी असते. त्यासाठी त्यावर CKWL असे लिहिले असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबईतल्या साकीनाका येथे गारमेंट गोदामाला आग

Maharashtra News: विहीर चोरीला गेली, तरुण शेतकऱ्याने शेतातच मृत्यूला कवटाळलं

राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर; मुख्यमंत्र्यांकडे गृहखात्यासह तब्बल २९ खाती; दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना कोणती मिळाली खाती?

कल्याण RTOची दमदार कामगिरी, ४०० कोटींहून अधिक महसूल जमा

धाड धाड...! विद्यार्थ्याकडून भर वर्गात गोळीबार; ४ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT