Indian Railway SwaRail  
बिझनेस

Indian Railway: रेल्वेचे SwaRail ऑल-इन-वन अ‍ॅप लॉन्च; Platform तिकीट ते जेवण, सर्व सुविधा मिळणार एकाच ठिकाणी

Indian Railway SwaRail : रेल्वे मंत्रालयाने एक नवीन सुपर अ‍ॅप लॉन्च केलंय. या अ‍ॅपनंतर IRCTC अ‍ॅप बंद होणार आहे का सुरू राहील याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाहीये.

Bharat Jadhav

भारतीय रेल्वेने प्रवाशांची गरज ओळखून सुपर अ‍ॅप SwaRail हे नवे अ‍ॅप लॉन्च केलंय. हे ऑल-इन-वन अ‍ॅप असून यातून तुम्हाला रेल्वेच्या सर्व सेवा एकाच ठिकाणी मिळू शकणार आहेत. या अॅपच्या मदतीने तुम्ही आरक्षण आणि अनारक्षित तिकिटे बुक करू शकतात. या SwaRail अ‍ॅपद्वारे प्लॅटफॉर्म तिकीट, पार्सल बुकिंग आणि PNR ची ही माहिती मिळणार आहे.

तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आता रेल्वेच्या कोणत्याही सुविधेसाठी फार टेन्शन घेण्याची गरज नाहीये. कारण तुम्हाला आता एकाच ठिकाणी रेल्वेच्या अनेक सुविधा मिळणार आहेत. त्यामागील कारण म्हणजे रेल्वे मंत्रालयाने एक नवीन सुपर अ‍ॅप लॉन्च केलंय. या अ‍ॅपमधून तुम्ही रेल्वेची हवी ती सेवा घेऊ शकणार आहात.

या अ‍ॅपचे नाव SwaRail आहे. रेल्वेने सर्वसामान्यांना पुरविलेल्या सर्व सेवा या अ‍ॅपवर प्रवाशांना मिळतील. भारतीय रेल्वेचे हे नवे सुपर अ‍ॅप सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टिम्सने (CRIS) विकसित केलंय. सध्या प्ले स्टोअरवर बीटा प्रोग्राममध्ये असणार आहे. रेल्वेचे हे सुपर अ‍ॅप सध्या विविध अ‍ॅप्सवरून उपलब्ध असलेल्या सर्व सेवा देईल. या अॅपच्या मदतीने तुम्ही आरक्षण आणि अनारक्षित तिकिटे बुक करू शकतात. या अ‍ॅपनंतर IRCTC अ‍ॅप बंद होणार आहे का सुरू राहील याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाहीये.

‘या’ सुविधा मिळणार

आरक्षण तिकिट बुकिंग

अनारक्षित तिकिटे

प्लॅटफॉर्म तिकीट

पार्सल बुकिंग

PNR माहिती

अन्न ऑर्डर आणि तक्रारी करता येणार आहेत. तसेच रेल्वेच्या या नव्या सुपर अ‍ॅपअंतर्गत युजर्सना ट्रॅव्हल असिस्टंट फीचरही मिळेल. यात सिंगल साइन-ऑन, ऑनबोर्डिंग आणि रेल्वे प्रवाशांना विविध सुविधा मिळतील. आता युजर्सला वेगवेगळ्या अ‍ॅप्ससाठी वेगवेगळे लॉगिन आयडी आणि पासवर्ड लक्षात ठेवण्याची गरज राहणार नाही. साध्या साइन इनच्या मदतीने प्रवाशांना सहज लॉग इन करता येईल. नवीन युजर्स सुरुवातीला काही महत्त्वाचे डिटेल्स टाकून साइन इन करू शकतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: देशातून फरार असलेला निलेश घायवळ खंडणी प्रकरणात निर्दोष मुक्त

Maharashtra Drought: शेतकऱ्यांना दिलासा! दुष्काळात वगळलेल्या तालुक्यांचा यादीत समावेश, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

Tea Water for Hair: केसगळती कमी करुन केस होतील शायनी आणि घनदाट; केसांना लावा चहा पत्तीचं पाणी

World Heart Day: सतत गुडघेदुखीचा त्रास होतोय? हृदयासाठीही ठरू शकतो इशारा, जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

Traffic E-Challan : ट्रॅफिक ई-चलन थकीत आहे? रस्त्यावरच गाडी जप्त होणार! जाणून घ्या सुप्रीम कोर्टाचे 'हे' १० कडक नियम

SCROLL FOR NEXT