Jyoti Bansal Saam Tv
बिझनेस

Jyoti Bansal: IPO येण्याआधीच कंपनी विकली, कर्मचाऱ्यांना रातोरात मिळवून दिले ४० कोटी,भारतीय वंशाच्या ज्योती बन्सल यांची स्टोरी वाचाच

Jyoti Bansal Story: भारतीय वंशाच्या ज्योती बन्सल यांनी आपली कंपनी विकून कर्मचाऱ्यांना कोट्यवधी केले आहे. ज्योती बन्सल यांनी आयपीओ येण्याआधीच कंपनी विकली.

Siddhi Hande

स्वतः चा व्यवसाय सुरु करावा अशी अनेकांची इच्छा असते. परंतु हा व्यवसाय उभारताना आपल्या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन जाणे हे खूप कमी लोकांना जमते. असंच काहीसं ज्योती बन्सल यांनी केलं. ज्योती बन्सल यांनी फक्त स्वतः लाच नाही तर कंपनीच्या कर्मचाऱ्यांनाही कोट्यवधी बनवले आहे. मूळचे भारतीय वंशाचे असणाऱ्या ज्योती बन्सल यांची प्रेरणादायी कहाणी वाचा.

ज्योती बन्सल यांनी सॉफ्टवेअर इंजिनियरिंगमध्ये मोठे काम केले आहे. त्यांनी २०१७ साली स्वतः ची सॉफ्टवेअर कंपनी सुरु केली. त्यांनी AppDynamics ची स्थापना केली. त्यानंतर त्यांनी या कंपनीचा विस्तार केला. (Success Story)

२०१७ साली AppDynamics ही कंपनी शेअर मार्केटमध्ये लिस्ट होण्यासाठी तयार होती. परंतु अचानक Cisco या कंपनीने ३.७ अब्ज डॉलर म्हणजेच ३१००० कोटी रुपयांची ऑफर कंपनीला दिली. ज्योती बन्सल यांनीदेखील ही ऑफर स्विकारली आणि आपली कंपनी विकली. त्यांनी याचा वाटा आपल्या कर्मचाऱ्यांनादेखील दिला. ज्योती बन्सल यांनी कर्मचाऱ्यांना कमीत कमी १ मिलियन डॉलर म्हणजे ८ कोटी रुपये दिले. काही कर्मचाऱ्यांनी ४० कोटी रुपयांपर्यंतचादेखील फायदा झाला. बन्सल यांनी फक्त स्वतः चा नाही तर कर्मचाऱ्यांचा विचार करुन कंपनी विकली आहे. (Jyoti Bansal Success Story)

हा निर्णय गोड-कडू- बन्सल

बन्सल यांनी कंपनी विकल्यानंतर चांगला नफा मिळवला. परंतु त्यांच्यासाठी हा निर्णय खूप कठीण असल्याचे त्यांनी सांगितलं. बन्सल यांनी सांगितले की, कंपनी विकणे हा क्षण माझ्यासाठी गोड-कडू होता. आम्ही अंतिम रेषेच्या काही अंतर मागे होतो. आर्थिकदृष्ट्या ही डील फायदेशीर होती. मात्र, अजून काहीवेळ कंपनीसाठी दिला असता तर समाधान मिळाले असते.

ज्योती बन्सल यांनी एका मुलाखतीत सांगितले की, मी ९ वर्ष या कंपनीसाठी काम केले होते. एकेदिवशी अचानक कंपनी विकल्याने मी खूप दुः खी झालो होतो. ही कंपनी अजून मोठी होऊ शकते, असं मला वाटतं होतं. यानंतर ७ वर्षांनी मी दोन सॉफ्टवेअर तयार केले. ते आता विविध सॉफ्टवेअर प्रोज्क्टमध्ये गुंतवणूक करत आहेत. (Jyoti Bansal Success Story)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Sena Dispute: पक्षाची रचना आम्ही ठरवू, 'मुख्य नेता हे पद आलं कुठून?' कपिल सिब्बलांचा आक्रमक युक्तीवाद,आज कोर्टात काय-काय घडलं?

Maharashtra News Live Update: परतवाड्यातील तरुणींच्या अश्लील व्हिडिओ प्रकरणातील मुख्य आरोपीला जामीन

Palghar Crime: ६ जणांकडून तरुणीवर बलात्कार, मित्रासोबत पिकनिकला गेली असता भयंकर घडलं, पालघर हादरले

Thigh length and diabetes: मांडीची लांबी सांगणार टाईप-२ मधुमेहाचा धोका? नव्या अभ्यासातून धक्कादायक संकेत

Dahi Handi Holiday : मोठी बातमी! दहीहंडीची सरकारी सुट्टी रद्द, आता 'या' सणाला मिळणार सुट्टी; वाचा फडणवीस सरकारचा निर्णय

SCROLL FOR NEXT