Mukesh Ambani Net Worth Saam Tv
बिझनेस

Indian Billionaires List 2023: भारतात सर्वाधिक श्रीमंत कोण? यादी आली; उद्योगपती मुकेश अंबानी कितव्या स्थानी?

ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी जगातील श्रीमंतांच्या यादीत ११ व्या क्रमांकावर पोहचलेत.

Ruchika Jadhav

Indian Billionaires List: भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींच्या यादीत नेहमी चढउतार पाहायला मिळतो. प्रसिद्ध आणि दिग्गज व्यवसायिकांमध्ये सध्या भारतातील मुकेश अंबानींच्या नावाची चर्चा होत आहे. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी जगातील श्रीमंतांच्या यादीत ११ व्या क्रमांकावर पोहचलेत. (Latest Marathi News)

या बाबत अधिक माहिती अशी की, भारतातील सर्वात श्रीमंत कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे ११ ऑगस्टपर्यंत ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार ९६.४ अब्ज डॉलर संपत्तीसह भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. तसेच जगातील ११ व्या क्रमांकाचे श्रीमंत ठरले आहेत. अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्या संपत्तीने यूएस-स्थित शॉर्ट सेलर हिंडेनबर्ग रिसर्च राजेश मास्कारेन्हासच्या अहवालानंतर जानेवारीमध्ये आलेल्या भारतीय अब्जाधीशांच्या यादीत ६६ वर्षीय अंबानी पुन्हा भारतातील पहिल्या स्थानावर पोहोचलेत.

मार्केट टेलविंड्स

शेअर बाजारातील जबरदस्त कामगिरीमुळे भारतीय अब्जाधीशांच्या संपत्तीत वाढ झाल्याचं दिसत आहे. वर्षाच्या सुरुवातीपासून बेंचमार्क सेन्सेक्स ७.३ टक्क्यांनी वाढला आहे. चालू वर्षाच्या संपत्तीत वाढ झालेल्या अव्वल १५ अब्जाधीशांमध्ये गौतम अदानी आणि राधाकिशन दमानी हे एकमेव आहेत.

१ जानेवारीपासून रिलायन्सच्या शेअर्समध्ये १०% वाढ झाली आहे. यामुळे अंबानींच्या संपत्तीत देखील वाढ झालीये. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये, Amazon चे संस्थापक जेफ बेझोस अदानींना मागे टाकत जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले होते. यंदा मुकेश अंबानी भारतातील प्रथम क्रमांकावर आहेत आणि जगातील ११ व्या क्रमांकावर.

भारतीय श्रीमंताची यादी आणि संपत्ती

मुकेश अंबानी - ९६.४

गौतम अदानी - ६३.९

शापूर मिस्त्री - ३१.१

शिव नाडर - २६.९

अझीम प्रेमजी - २४.७

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime : प्रेमा तुझा रंग कसा? एक्स गर्लफ्रेंडला ९ वेळा चाकूने भोसकलं, नंतर बॉयफ्रेंडने स्वत: आयुष्य संपवलं

Mumbai : सतत डोअरबेल वाजवल्याने सटकली, तरुणाने डिलिव्हरी बॉयवर केला गोळीबार; मुंबईत थरार

Rajesh Khanna: गळ्यात मंगळसूत्र, कपाळावर कुंकू; राजेश खन्ना यांनी या अभिनेत्रीसोबत केलं गुपचुप लग्न, अनेक वर्षांनंतर केला खुलासा

WhatsApp Security : व्हॉट्सअ‍ॅप कधीच होणार नाही हॅक, सायबर एक्सपरर्टने दिला भन्नाट सल्ला

Maharashtra Live News Update: राधानगरी धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला

SCROLL FOR NEXT