US-India Trade Deal Saam Tv
बिझनेस

US-India Trade Deal: भारत-अमेरिका ट्रेड ड्रीलवर शिक्कामोर्तब; दूध, फळे ते पालेभाज्या...;'या' गोष्टी होणार स्वस्त

US-India Trade Deal 25 percent Tarrif Reduce: भारत आणि अमेरिकेत एक अंतरिम करार झाला आहे. यामध्ये आता अमेरिकेने भारतावरील टॅरिफ २५ टक्क्यांनी कमी केला आहे.

Siddhi Hande

भारत-अमेरिकेत करार

अमेरिकेने भारतावरील टॅरिफ २५ टक्क्यांनी कमी केला

अनेक उपयोगी गोष्टींवर कर कपात

भारत आणि अमेरिकेत अंतरिम व्यापारासंबंधित कराराची रुपरेषा जाहीर करण्यात आली आहे. या करारामुळे दोन्ही देशांमध्ये व्यापार करारच्या दिशेने अत्यंत वेगवान होणार आहे. दरम्यान, अलीकडेच भारतासाठी समाधानकारक बातमी समोर आली आहे. टॅरिफ कमी करण्यात आला आहे. यामुळे अनेक वस्तू स्वस्त होणार आहे.

टॅरिफमध्ये वाढ केल्याने दोन्ही देशांमध्ये संबंध बिघडले होते.दरम्यान, आता या करारामुळे हे संबंध सुधारणार असल्याचे दिसत आहे. दोन्ही देशांमधील आर्थिक संबंध सुधारण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल आहे.

याबाबत निवेदनात म्हटलंय की, भारत आणि अमेरिका या कराराची लवकरच अंबलबजावणी करतील. या अंतरिम करारासाठी दोन्ही देश एकत्र काम करणार आहेत.

२५ टक्के अतिरिक्त कर रद्द

मिडिया रिपोर्टनुसार, हा करार होण्याआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफची घोषणा केली आहे. भारतीय वस्तूंवरील अतिरिक्त २५ टक्के कर काढून टाकत आहे, असं त्यांनी म्हटलं. यानंतर हा निर्णय लागू झाला आहे. याचसोबत भारताने रशियन तेल खरेदी केल्यावर हा कर लादण्यात आला होता.

ट्रम्प यांनी दावा केला की, हा करार दोन्ही देशांतील व्यापारातील अडथळे कमी करेल आणि अमेरिकेकडून तेलासह इतर उत्पादनांची खरेदी वाढवेल.

अनेक भारतीय उत्पादनांवर शून्य कर

या अंतरिम कराराअंतर्गत अमेरिकेने जेनेरिक फार्मास्युटिकल्स, रत्ने, दागिने आणि विमान प्रवासावरील शून्य शुल्क लादले आहे. यामुळे निर्यातीत वाढ होईल आणि मेक इन इंडियाला चालना मिळेल.

शेतकऱ्यांनाही दिलासा

भारत आणि अमेरिकेतील या करारामुळे अनेक गोष्टी स्वस्त होणार आहे. मंत्री पियुष गोयल यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलंय की, हा करार शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आहे. मका, गहू, तांदूळ, कुक्कुटपालन, दूध, चीज, इंधन, तंबाखू आणि भाज्या, मांस या उत्पादनांना संरक्षण देणारा करार आहे. दुग्धजन्य पदार्थांचाही यामध्ये समावेश आहे. हा करार भारत आणि अमेरिकेतील आर्थिक सहाय्य अधिक दृढ करण्यासाठी मदत करेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

Deepali Sayyad: 'कितीही धमक्या येऊ द्या....'; भोंदू अशोक खरातवरील चित्रपटाबाबत अभिनेत्री दीपाली सय्यदची ठाम भूमिका

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणी सर्वात मोठी अपडेट, मनीषा हवलदार आणि तेजस शहा यांच्या मधला दुवा सापडला?

राज्यात घराणेशाहीची दुसरी इनिंग, मुलांच्या आमदारकीसाठी नेत्यांचं लॉबिंग, नेत्यांच्या मुलांसाठी निष्ठावंतांना डावलणार?

SCROLL FOR NEXT