Income Tax Return Deadline Extended: साम टीव्ही
बिझनेस

करदात्यांसाठी सर्वात मोठी बातमी! इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत वाढली; पाहा नवी अंतिम तारीख

Income Tax Return : करदात्यांसाठी मोठी बातमी! CBDT ने इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम मुदत २१ नोव्हेंबरपर्यंत वाढवली आहे. तांत्रिक अडचणी आणि विलंबामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

Namdeo Kumbhar

Income Tax Return Deadline Extended: देशातील लाखो करदात्यांसाठी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. आर्थिक वर्षातील इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम मुदत सरकारने थेट २१ नोव्हेंबरपर्यंत वाढवली आहे.

तांत्रिक अडचणी आणि करदात्यांना झालेला विलंब विचारात घेऊन प्रशासनाने ही डेडलाईन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या मुदतवाढीमुळे ऐन मोक्याच्या वेळी टॅक्स रिटर्न भरताना होणारी धावपळ थांबणार असून, करदात्यांना आपले आर्थिक व्यवहार व्यवस्थित पूर्ण करण्यासाठी मोठा वेळ मिळाला आहे.

भारत सरकारच्या वित्त मंत्रालयांतर्गत केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) २८ सप्टेंबर २०२६ रोजी हे प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. संबंधित करदात्यांसाठी ऑडिट रिपोर्ट सादर करण्याची तारीख २१ ऑक्टोबर २०२६ करण्यात आली आहे. पूर्वी ही मुदत ३१ ऑक्टोबर २०२६ होती. याबाबतचा अधिकृत आदेश/अधिसूचना स्वतंत्रपणे जारी करण्यात येत असल्याचे पत्रात नमूद केले आहे.

आयकर कायदा, १९६१ च्या कलम १३९ (१) अंतर्गत ज्या व्यक्ती आणि कंपन्यांना ऑडिट रिपोर्ट (लेखापरीक्षण अहवाल) सादर करणे बंधनकारक असते, त्यांच्यासाठी हा निर्णय लागू असेल. या करदात्यांसाठी ऑडिट रिपोर्ट सादर करण्याची मुदतही वाढवण्यात आली आहे. आता त्यांना २१ ऑक्टोबर २०२६ ऐवजी वाढीव मुदतीत आपला अहवाल सादर करता येणार आहे. या मुदतवाढीमुळे ऐन सणासुदीच्या काळात सीए (CA) आणि करदात्यांना आपले आर्थिक व्यवहार व रिटर्न व्यवस्थित पूर्ण करण्यासाठी मोठा वेळ मिळाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Google Search: गुगलवर चुकूनही या 5 गोष्टी सर्च करू नका, महागात पडेल

Bihar Politics: विधान परिषदेच्या अध्यक्षांचा राजीनामा; कोणत्या पक्षाकडे जाणार पद अन् कोण होणार नवे सभापती?

Bank Employees Overtime : रविवारी काम करणाऱ्या बँक कर्मचाऱ्यांना किती ओव्हरटाइम मिळणार? जाणून घ्या नेमका हिशोब

Maharashtra News Live Update: लाडक्या बहीण योजना बाजूला करणार नाही, त्यासाठी वेगळा निधी: बावनकुळे

Maharashtra : महाराष्ट्रातील ऋषिकेश म्हणून प्रसिद्ध आहे 'हे' ठिकाण, पाण्याच्या लाटांवर अनुभवाल थरार

SCROLL FOR NEXT