Tax For Panipuriwala  google
बिझनेस

Income Tax: पाणीपुरीवाल्याला 40 लाखांचा इन्कम टॅक्स? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Tax For Panipuriwala : पाणीपुरीवाल्याला तब्बल 40 लाखांची नोटीस आलीय. खरंच 40 लाखांची नोटीस आलीय का? याची आम्ही पडताळणी केली, त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात.

Sandeep Chavan

पाणीपुरी अनेकांचं आवडतं फास्ट फूड. मात्र,पाणीपुरीवाला किती पैसे कमावतो हे तुम्हाला माहित आहे का? एका पाणीपुरीवाल्याची कमाई पाहून तुम्हीही हैराण व्हाल.पाणीपुरीवाल्याला तब्बल 40 लाखांची नोटीस आलीय.खरंच 40 लाखांची नोटीस आलीय का? याची आम्ही पडताळणी केली, त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात.

पाणीपुरीवाल्याला 40 लाखांची नोटीस पाहून सगळ्यांनाच धक्का बसला असेल...मात्र, होय एका पाणीपुरीवाल्याला तब्बल 40 लाखांची जीएसटीची नोटीस आलीय. सोशल मीडियावर हा दावा केला जातोय.तशी नोटीसही दाखवण्यात आलीय. या व्हायरल नोटीसमध्ये 17 डिसेंबर 2024 ही तारीख लिहिलीय.यामध्ये विक्रेत्याकडून गेल्या तीन वर्षातील व्यवहारांचा तपशील मागवण्यात आला आलाय. मात्र, हे खरं आहे का? मेसेजमध्ये काय दावा केलाय ते आधी पाहुयात

व्हायरल मेसेज

पाणीपुरीवाल्याने UPIद्वारे ऑनलाईन पैसे घेतल्यानंतर काय घडलं पाहा. पाणीपुरी विकणाऱ्या एका व्यक्तीने ऑनलाईन पेमेंट द्वारे वर्षाला 40 लाखांची कमाई केली. त्यानंतर त्याला GSTची नोटीस आली. असेच अनेक मेसेज व्हायरल केले जातायत. खरंच पाणीपुरीवाल्याला नोटीस आलीय का. ? पाणीपुरीवाल्याला 40 लाखांची नोटीस मग त्याचा महिन्याचा धंदा किती असेल...? असे अनेक प्रश्न उपस्थित होतायत

कारण, नोटीस 40 लाखांची असेल तर नक्कीच धंदा कोटींचा असेल...त्यामुळे खरंच असा करोडपती पाणीपुरीवाला आहे का...? हे तपासण्यासाठी आमच्या टीमने पडताळणी सुरू केली...त्यावेळी काय सत्य समोर आलंय पाहुयात.

व्हायरल सत्य /साम इन्व्हिस्टिगेशन

40 लाखांची नोटीस आलेला पाणीपुरीवाला तामिळनाडूचा

जीएसटी नियमानुसार, पाणीपुरीवाल्याला नोटीस

40 लाख वार्षिक उलाढाल असलेल्यांना नोंदणी आवश्यक

कर आकारणी नियमांचे पालन करणे आवश्यक

पाणीपुरीवाल्याचं वार्षिक उत्पन्न 40 लाखांपेक्षा जास्त

या पाणीपुरीवाल्याचं उत्त्पन्न 40 लाखांपेक्षा जास्त आहे...आणि युपीए पेमेंटद्वारे 40 लाख रुपये आल्याने नियमानुसार या पाणीपुरीवाल्याला नोटीस आली...त्यामुळे आमच्या पडताळणीत हा दावा सत्य ठरलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today : पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या, पण सोनं-चांदी झालं स्वस्त; जाणून घ्या २४k, २२k चे ताजे दर

Maharashtra News Live Update: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चांदी वाहून नेणारी व्हॅन उलटली

Shehnaaz Gill Dating RCB Cricketer News: आरसीबीच्या 'या' खेळाडूवर शहनाज गिल फिदा? 'त्या' एका फोटोमुळे रंगल्या अफेअरच्या चर्चा

Actors Wife Money Fraud: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याच्या पत्नीची मोठी फसवणूक; BMC च्या बड्या अधिकाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

High Blood Sugar: ही ७ लक्षणं दिसली तर समजा तुमच्या रक्तात साखरेचं प्रमाण वाढतंय

SCROLL FOR NEXT