Jio World Plaza  saam Tv
बिझनेस

Apple ला टक्कर देणार Samsung? बीकेसीमध्ये सुरु केलं नवीन एक्‍स्‍पीरिअन्‍स स्‍टोअर; जाणून घ्या काय आहे खास

Samsung BKC Lifestyle : हे नवीन स्‍टोअर सॅमसंगच्‍या एआय इकोसिस्‍टमच्‍या क्षमतेचा फायदा घेत सॅमसंगच्‍या व्‍यापक प्रिमिअम पोर्टफोलिओला दाखवते. ज्‍यामध्‍ये स्‍मार्टफोन्‍स, टेलिव्हिजन्‍स, रेफ्रिजरेटर्स, वॉशिंग मशिन्‍स आणि इतर उत्‍पादनांचा समावेश आहे.

Bharat Jadhav

BKC Lifestyle Experience Store :

सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स कंपनीने आज मुंबईतील नुकतेच उद्घाटन करण्‍यात आलेले रिटेल, लेजर व डायनिंगसाठी अल्‍ट्रा-लक्‍झरी परिसर जिओ वर्ल्‍ड प्‍लाझा मॉलमध्‍ये भारतातील त्‍यांच्‍या पहिल्‍या ऑनलाइन-टू-ऑफलाइन (ओ२ओ) लाइफस्‍टाइल स्‍टोअरचे उद्घाटन केले. असे करत कंपनीने भारतातील आपली कटिबद्धता अधिक दृढ केलीय. (Latest News)

जिओ वर्ल्‍ड प्‍लाझामधील ८,००० चौरस फूट जागेवर पसरलेले सॅमसंग बीकेसी मुंबईतील मध्‍यवर्ती व्‍यवसाय हब वांद्रे कुर्ला कॉम्‍प्‍लेक्‍स येथे धोरणात्‍मकरित्‍या स्थित आहे आणि अद्वितीय क्‍यूरेटेड अनुभव वास्‍तविक जीवनातील स्थितींच्‍या माध्‍यमातून सॅमसंगच्‍या टॉप-ऑफ-द-लाइन प्रिमिअम उत्‍पादनांना दाखवेल. हे नवीन स्‍टोअर सॅमसंगच्‍या एआय इकोसिस्‍टमच्‍या क्षमतेचा फायदा घेत सॅमसंगच्‍या व्‍यापक प्रिमिअम पोर्टफोलिओला दाखवते, ज्‍यामध्‍ये स्‍मार्टफोन्‍स, टेलिव्हिजन्‍स, रेफ्रिजरेटर्स, वॉशिंग मशिन्‍स आणि इतर उत्‍पादनांचा समावेश आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

देशातील पहिल सॅमसंग ओ२ओ स्‍टोअर सॅमसंग बीकेसी रिटेल खरेदी अनुभवाला नव्‍या उंचीवर घेऊन जाईल आणि सर्वोत्तम ऑनलाइन व ऑफलाइन विश्‍वांना एकत्र आणत ग्राहकांसाठी नवीन शक्‍यता अनलॉक करेल. या रिटेल नाविन्‍यतेच्‍या माध्‍यमातून सॅमसंग बीकेसी स्‍टोअर ऑनलाइन सोयीसुविधेमध्‍ये वाढ करत आहे. जेथे ऑनलाइन डिजिटल कॅटलॉगमधून १,२०० हून अधिक निवडींसह उत्‍पादनांची व्‍यापक श्रेणी प्रदान करण्‍यात आली आहे. तसेच स्‍टोअरमध्‍ये कर्मचाऱ्यांकडून उत्तम साह्य देखील करण्‍यात येईल. याव्‍यतिरिक्‍त, ही उत्‍पादने मुंबईसह देशातील कोणत्‍याही भागांमध्‍ये वितरित करता येऊ शकतात.

ुंबईतील ग्राहकांना Samsung.com/in वरून ऑनलाइन खरेदी करण्‍याचा आणि दोन तासांच्‍या आत सॅमसंग बीकेसी त्‍यांची उत्‍पादने पिक-अप करण्‍यासाठी जवळच असलेल्‍या स्‍टोअर सुविधेचा लाभ घेण्‍याचा पर्याय देखील आहे. ग्राहकांसाठी खुले करण्‍यात आलेले सॅमसंग बीकेसी नवीन गॅलॅक्‍सी एस२४ सिरीज खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी प्रमुख अनुभवाला नव्‍या उंचीवर घेऊन जाईल. हे स्‍टोअर गॅलॅक्‍सी एस२४ स्‍पेशल एडिशन कलर पर्यायांसह त्‍यांच्‍या नवीन गॅलॅक्‍सी एआय स्‍मार्टफोनचे मोफत अद्वितीय जेन एआय सक्षम वैयक्तिकरण देखील देईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jintur Crime : आपसी वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी; लाठ्याकाठ्या अन् लोखंडी रॉडने मारहाण, आठ जण जखमी

Maharashtra Live News Update: राहुल पाटील यांचा काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेस (AP )मध्ये प्रवेश

Viral Video: ऑफिसला सुट्टी नाही, मग मुलीने केलं नको ते कृत्य, थेट मॅनेजरलाही केला व्हिडीओ कॉल

Ganeshotsav Pune : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दोन दिवशी दारूची दुकाने राहणार बंद

Atharwa Sudame Controversy : गणेशोत्सवाच्या रिलवरुन सोशल मीडिया स्टार अथर्व सुदामेवर टीकेची झोड, नेमके प्रकरण काय? VIDEO

SCROLL FOR NEXT