Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: इंग्रजी येत नाही म्हणून कॉलेजमध्ये हिणवलं, जिद्दीने क्रॅक केली UPSC; IAS सुरभि गौतम यांचा प्रेरणादायी प्रवास

Success Story of IAS Surbhi Gautam: आयएएस सुरभि गौतम यांनी यूपीएससी परीक्षेत ५०वी रँक प्राप्त केली. त्यांनी खूप मेहनतीने हे यश मिळवले आहे.

Siddhi Hande

यूपीएससी ही देशातील सर्वात अवघड परीक्षा आहे. यूपीएससी परीक्षा देण्यासाठी दिवसाला ८-९ तास अभ्यास करावा लागतो.मन लावून अभ्यास केल्यावर यश हे नक्कीच मिळते. असंच काहीसं सुरभि गौतम यांच्यासोबत झालं. सुरभि गौतम यांनी खूप मेहनतीने यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे. सुरभि यांना इंग्रजी बोलण्याचा प्रॉब्लेम होता. त्यामुळे कॉलेजमध्ये इतर जण त्यांना चिडवायचे. परंतु तरीही त्यांनी याकडे दुर्लक्ष केले आणि आपला अभ्यास सुरु ठेवला.

शिक्षण

सुरभि या मूळच्या मध्यप्रदेशमधील एका गावच्या रहिवासी आहेत. त्या लहानपणापासूनच अभ्यासात खूप हुशार होत्या. त्यांनी १०वी आणि १वीच्या परीक्षेत ९० टक्के गुण मिळवले होते. त्यानंतर त्यांनी इंजिनियरिंग डिग्री प्राप्त केली. त्यांनी अनेक स्पर्धा परीक्षेत यश मिळवले होते. त्यांनी २०१६ मध्ये यूपीएससी परीक्षेत ५०वी रँक प्राप्त केली.

इंग्रजी येत नसल्याने उडवली खिल्ली

कॉलेजमध्ये सुरभि यांना खूप चिडवले जायचे. त्यांना इंग्रजी येत नसल्याने त्यांची खिल्ली उडवायचे. परंतु आज त्यात सुरभि गौतम या आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी सर्वात अवघड परीक्षा पास केली आहे. इंग्रजी भाषा येत नाही त्यामुळे त्यांच्या यशात कोणताही अडथळा आला नाही.

सुरभि गौतम यांनी इंजिनियरिंगचे शिक्षण पूर्ण केले. त्यांनी स्टेट इंजिनियरिंग प्रवेश परीक्षा दिली. त्यानंतर भोपाळ इंजिनियरिंग कॉलेजमधून इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनियरिंगमध्ये बीटेक पदवी प्राप्त केली. त्यांनी या परीक्षेत गोल्ड मेडल मिळवले होते.

कॉलेजमध्ये असताना त्यांनी युनिव्हर्सिटीमध्ये टॉप केले होते. कॉलेजनंतर त्यांनी अनेक स्पर्धा परीक्षा दिल्या. त्यांना ISRO, BARC, IES, IAS परीक्षेत यश मिळवले. त्यानंतर २०२६ मध्ये त्यांनी यूपीएससी परीक्षेत ५०वी रँक प्राप्त केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे आंदोलन

Drishyam 3 Cast Fee: 'दृश्यम 3'च्या स्टारकास्टची फी किती? अजय देवगणला तब्बूपेक्षा 528% अधिक मानधन

Pumpkin seeds: कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळेल आणि हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी, रोज सकाळी खा मूठभर 'या' बिया

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

Political News : राजकीय वर्तुळात मोठी घडामोड! काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, 'या' नेत्याकडे दिली जबाबदारी

SCROLL FOR NEXT