Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: जिद्द! ९ तासांची नोकरी करत केली UPSC क्रॅक; IAS श्वेता भारती यांचा प्रेरणादायी प्रवास

Success Story of IAS Shweta Bharti: आयएएस श्वेता भारती यांनी नोकरी करत यूपीएससी परीक्षा पास केली आहे. त्यांनी खूप कमी वयात हे यश मिळवलं आहे.

Siddhi Hande

यूपीएससी ही देशातील सर्वात अवघड परीक्षा आहे. यूपीएससी परीक्षा देण्यासाठी दिवसरात्र मेहनत करावी लागते. अनेक आयएएस-आयपीएस ऑफिसर आहेत की ज्यांनी नोकरी करत यूपीएससी परीक्षा दिली आहे. असंच श्वेता भारती यांनीदेखील केले. त्यांनी प्रायव्हेट नोकरी करत यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे.

यूपीएससी (UPSC) परीक्षा क्रॅक करण्यासाठी रोज १० आणि १२ तास अभ्यास करावा लागतो. मिडिया रिपोर्टनुसार, श्वेता भारती यांनी ९ तासांची नोकरी करत यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे.

श्वेता भारती (IAS Shweta Bharti) या मूळच्या बिहारच्या नालंदा येथील रहिवासी आहेत.त्या लहानपणापासूनच अभ्यासात खूप हुशार होत्या. रिपोर्टनुसार, त्यांनी पाटणा येथील ईशान इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमधून आपले शिक्षण पूर्ण केले. यानंतर त्यांनी भागलपूर इंजिनियरिंग कॉलेजमधून इलेक्ट्रिकल आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनियरिंगमध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केले. ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर त्यांना विप्रो या कंपनीत नोकरी मिळाली.

विप्रो (Wipro) कंपनीत नोकरी करत असतानाच त्यांच्या डोक्यात सिव्हिल सर्व्हिसमध्ये जाण्याचा विचार आला. परंतु काही जबाबदाऱ्यांमुळे त्या नोकरी सोडू शकत नव्हत्या. त्यांनी ९ तासांची नोकरी करत अभ्यास केला. त्या शिफ्ट संपल्यानंतर रात्री अभ्यास करायच्या. नोकरीसोबत अभ्यास करणे हे खूप कठीण जायचे परंतु त्यांनी सतत प्रयत्न केले. त्यांनी स्मार्टफोन वापरणे पूर्णपणे सोडून दिले होते.

श्वेता भारती यांच्या मेहनतीचे यश त्यांना मिळाले. त्यांनी बीपीएससी परीक्षेत चांगले गुण मिळाले. परंतु आयएएस होणे हे त्यांचे स्वप्न होते. त्यामुळे त्यांनी यूपीएससी परीक्षा दिली. त्यांनी २०२१ मध्ये ३५६ रँक प्राप्त केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Traffic: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! शहरातील प्रमुख रस्त्यावरील वाहतुकीत मोठे बदल, पर्यायी मार्ग कोणते?

Daily Habits: तुम्हीही नकळत करताय या चुका? शरीरावर होऊ शकतो गंभीर परिणाम, आजच बदला सवयी

Maharashtra News Live Update: पालघरमध्ये विराज प्रोफाइल कंपनीविरोधात आदिवासींचं बेमुदत धरणे आंदोलन; प्रकल्प रद्द करण्याची मागणी

SBI Data Leak : SBI च्या खातेधारकांना मोठा धक्का, नाव, नंबर अन् पत्ता... ग्राहकांची संपूर्ण माहिती डार्क वेबवर लीक

Car Accident: काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याच्या कारचा चक्काचूर; मुंबई-नागपूर हायवेवर भरधाव ट्रकची धडक, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT