Hyundai CRETA Facelift Saam Tv
बिझनेस

आकर्षक लूक आणि तगडे सेफ्टी फीचर्ससह लाँच होणार Hyundai CRETA; पाहा फोटो

Hyundai CRETA Facelift: ह्युंदाई ही वाहन उत्पादन कंपन्यांमधील प्रसिद्ध कंपनी आहे. कंपनी लवकरच बहुप्रतिक्षित एसयूव्ही Hyundai Creta लाँच करणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Hyundai Creta Facelift Features And Specification:

ह्युंदाई ही वाहन उत्पादन कंपन्यांमधील प्रसिद्ध कंपनी आहे. कंपनी नेहमीच ग्राहकांसाठी नवनवीन कार लाँच करत असते. कंपनी लवकरच बहुप्रतिक्षित एसयूव्ही Hyundai Creta लाँच करणार आहे. कंपनीने या कारचे फोटो प्रसिद्ध केले आहे. याआधी कंपनीने कारचा टीझर इमेज शेअर केला होता. त्यानंतर आता कारमधील इंटेरियरची माहिती समोर आली आहे.

ह्युंदाई कंपनीची ही नवीन एसयूव्ही १६ जानेवारीला लाँच होणार आहे. ह्युंदाईने २०२० मध्ये एययूव्हीचे सेकंड जनरेशन मॉडेल लाँच केले होते. त्यानंतर या कारमध्ये मोठे बदल झाले नव्हते. त्यानंतर आता या कारला नवीन मॉडेलमध्ये लाँच करण्यात येणार आहे. कंपनीने या नवीन कारमध्ये इंटेरियरपासून अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत. (Latest News)

डिझाइन

नवीन ह्युंदाई क्रेटा नवीन डिझाइनसह लाँच होणार आहे. या नवीन कारमध्ये ऑल- एलईडी लायटिंग पाहायला मिळणार हे. तसेच या कारमध्ये L- शेप डिझाइन करण्यात आली आहे. कारमध्ये नवीन टेल गेटसह ऑल LED लायटिंग बार देण्यात आला आहे. ही नवीन एसयूव्ही मॉडर्न लूकसह लाँच होणार आबे. कारच्या मागील बाजूस टेल-लँप सेटअपला जोडणारी LED लाइट आहे.

इंटेरियर

ह्युंदाईने या नवीन एसयूव्हीमध्ये नवीन अपडेट केले आहे. कारमध्ये 10.25 इंच कनेक्टेड स्क्रिम, डॅशबोर्ड आणि वेंट डिझाइनमध्ये बदल करण्यात आले आहे. या कारमधील केबिन अत्यंत मोठे आहे. यात इंटिग्रेटेड इंफोटेंमेंट सिस्टम आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आला आहे.

इंजिन

ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्टच्या इंजिनमध्ये फारसा बदल केलेला नाहीये. नवीन कार तीन इंजिन पर्यायांसह उपलब्ध आहे. ह्युंदाई क्रेटामध्ये 6-स्पीड मॅन्युअल, IVT , 7-स्पीड DCT आणि 6- स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह लाँच करण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

5G Phones India : कोणत्या स्वस्तात कमी बजेट मध्ये 5G फोन कॅमेरा आणि बॅटरी लाईफ चांगली आहे?

Ambarnath Crime : अंबरनाथमधील हल्ला प्रकरणात धक्कादायक खुलासा; सहा तरुणांविरोधात गुन्हा दाखल

Politics : 'ED-CBIची चौकशी थांबवा; आम्ही भाजपमध्ये येतो...' बड्या खासदाराचा खळबळजनक दावा

Crime: 'एका रात्रीत तीन वेळा...', घरी बोलावून घेतलं, खासदाराकडून २ तरुणांवर बलात्कार

Cyber Crime: बॅंकिग फ्रॉड टाळण्यासाठी 'या' टिप्स करा फॉलो

SCROLL FOR NEXT