HSRP Number Plate Saam Tv
बिझनेस

HSRP Number Plate: वाहनधारकांनो, हे काम आताच करा, अन्यथा बुधवारपासून PUC मिळणार नाही, HSRP बाबत महत्त्वाची अपडेट

HSRP Number Plate Registration: एचएसआरपी नंबरप्लेटबाबत नवीन अपडेट समोर आली आहे. आता एचआरपी नंबरप्लेट नसलेल्या वाहनांना बुधवारपासून पीयूसी मिळणार नाहीये.

Siddhi Hande

वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी

एचएसआरपी नंबरप्लेटशिवाय पीयूसी मिळणार नाही

१५ एप्रिलपासून नवीन नियम लागू

वाहनधारकांना एचएसआरपी नंबरप्लेट बसवणे अनिवार्य केले आहे. जर एचएसआरपी नंबरप्लेट नसेल तर तुम्हाला आता चांगलाच फटका बसणार आहे. एचएसआरपी नंबरप्लेट नसल्यास तुम्हाला वाहनाची पीयूसी मिळणार नाहीये. त्यामुळे वाहनधारकांचे टेन्शन वाढणार आहे. १५ एप्रिलपासून तुम्हाला पीयूसी मिळणार नाही.

१५ एप्रिलपासून नवीन नियम लागू (HSRP Number Plate New Rule From 15th April)

एचएसआरपीबाबत नवीन नियम १५ एप्रिलपासून सागू होणार आहे. उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये हे नियम लागू होणार आहेत. ज्या वाहनांना एचएसआरपी नंबरप्लेट नसेल त्यांना दंडदेखील भरावा लागणार आहे. हाय सिक्युरीटी नंबरप्लेट न बसवल्यास तुमच्या वाहनांना अनफिट ठरवले जाईल. त्यामुळे तुम्ही जर अजूनही नंबरप्लेट बसवली नसेल तर लगेच बसवून घ्या. तुम्ही घरबसल्या मोबाईलवरुन एचएसआरपी नंबरप्लेटसाठी बुकिंग करु शकतात.

HSRP नंबरप्लेट कशी बसवायची? (How to Register For HSRP Number Plate)

तुम्हाला एचएसआरपी नंबरप्लेट बनवण्यासाठी सर्वात आधी Book My HSRP वेबसाइटवर जायचे आहे.

होमपेजवर तुम्हाला High Security Registration Plate with Colour Sticker हा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा.

यानंतर तुम्ही तुमच्या वाहनाची सर्व माहिती भरा. राज्य, रजिस्ट्रेशन नंबर, चेसिस नंबर आणि इंजिन नंबर लिहा.

यानंतर तुमचा जिल्हा आणि डीलर निवडा जिथे तुम्हाला नंबरप्लेट लावावी लागेल.

यानंतर अपॉइंटमेंट बुक करा. यानंतर तुम्ही डीलरकडे जाऊन हाय सिक्युरिटी नंबरप्लेट बसवा.

यानंतर ऑनलाइन पेमेंट करा. यानंतर तुम्हाला रिसिप्ट मिळेल ती तुमच्याजवळ ठेवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दिल्ली विधानसभेला बॉम्बने उडवून देण्याचा ईमेल

Blood Pressure Risk: हे फळ खाल्लं तर BPचा त्रास वाढणार, आत्ताच व्हा सावध; डॉक्टरांचा सल्ला वाचाच

Gas Leakage Safety Tips: किचनमध्ये अचानक गॅस सिलेंडर लिंक झाला? लगेच या 5 गोष्टी करा

Beed Crime News: बीडमध्ये शेतकऱ्याची निर्घृण हत्या; बाप-लेकासह नातवावर गुन्हा दाखल

Pune : पुणे हादरलं! प्राचार्यने केला पीएचडीच्या विद्यार्थिनीचा विनयभंग, तरुणीने संपवल आयुष्य; आत्महत्येपूर्वी चिठ्ठीत लिहलं कारण

SCROLL FOR NEXT