PF Advance Money Withdrawal Saam Tv
बिझनेस

PF News: 72 तासांत तुमच्या बँक खात्यात येऊ शकतात पीएफचे पैसे, जाणून घ्या कसे...

PF Advance Money Withdrawal: 72 तासांत तुमच्या बँक खात्यात येऊ शकतात पीएफचे पैसे, जाणून घ्या कसे...

Satish Kengar

PF Advance Money Withdrawal Process in Marathi: 

तुम्ही नोकरी करत असाल तर साहजिकच तुमची बचतही होत असेल? लोक त्यांच्या भविष्यासाठी बँकांमध्ये किंवा विविध योजनांमध्ये गुंतवणूक करतात. जेणेकरून त्यांना चांगली बचत करता येईल. पण नोकरदार लोकांच्या पीएफ खात्यातही बचत असते. दर महिन्याला कर्मचार्‍याच्या पगारातून ठराविक रक्कम कापून पीएफ खात्यात जमा केली जाते. (How to Withdraw Pf Online, Step by Step Process in Marathi)

त्याचबरोबर या पैशावर वार्षिक व्याजही मिळते. मात्र, हे पैसे तुम्ही नोकरीच्या मध्यावरही काढू शकता. परंतु काहीवेळा पीएफचे पैसे यायला बराच वेळ लागतो, परंतु जर तुम्ही योग्य पद्धत अवलंबली तर जवळपास 72 तासांच्या आत पैसे तुमच्या बँक खात्यात येऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊया या पद्धतीबद्दल.

जर तुम्हाला पैशांची जास्त गरज असेल, तर तुम्ही 'कोविड अॅडव्हान्स' पर्याय वापरून अप्लाय करू शकता. याद्वारे सुमारे 72 तासांत तुमच्या बँक खात्यात पीएफचे पैसे येऊ शकतात.  (Latest Marathi News)

'कोविड अॅडव्हान्स'द्वारे पीएफचे पैसे काढण्याची पद्धत:

  • तुम्हालाही नोकरीदरम्यान अचानक पैशांची गरज भासल्यास तुम्ही तुमच्या पीएफमधून पैसे काढू शकता.

  • यासाठी तुम्हाला सर्वप्रथम EPFO ​​च्या अधिकृत पोर्टलवर जावे लागेल unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface.

  • त्यानंतर येथे UAN नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकून लॉगिन करा.

  • पोर्टलवर गेल्यानंतर 'ऑनलाइन सेवा' पर्यायावर क्लिक करा आणि तळाशी असलेल्या क्लेम पर्यायावर क्लिक करा.  (Utility News)

  • त्यानंतर तुमच्या बँक खात्याचा खाते क्रमांक टाकून त्याची पडताळणी करा.

  • आता पीएफ अॅडव्हान्स फॉर्मवर क्लिक करा आणि पैसे काढण्याचे कारण आणि आवश्यक रक्कम भरा.

  • यानंतर चेक किंवा पासबुकची स्कॅन कॉपी अपलोड करा.

  • त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल (आधार कार्डशी लिंक केलेला नंबर)

  • ते एंटर करा आणि सबमिट करा, त्यानंतर सर्वकाही बरोबर आढळल्यास, सुमारे 72 तासांच्या आत पैसे तुमच्या बँक खात्यावर पाठवले जातात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips For Washing Clothes: रात्री कपडे धुवावे की नाही? काय सांगते वास्तू शास्त्र

पुण्यातील रीलस्टार वादात; महिला पत्रकाराच्या विनयभंग प्रकरणी पोलिसांत गुन्हा, काय आहे संपूर्ण प्रकरण?

Running vs Walking Benefits: 30 मिनिटे धावणं की 1 तास चालणं? फिट राहण्यासाठी कोणता पर्याय ठरेल बेस्ट

Maharashtra Live News Update: म्हाडाच्या घरासाठी 2188 अर्ज प्राप्त

Summer Yoga Tips: उन्हाळ्यात योगा करताना या चुका करू नका, नाहीतर होईल मोठा त्रास

SCROLL FOR NEXT