Aadhaar Download meta ai
बिझनेस

Aadhaar Card : आधार कार्ड जवळ नसेल तरी चिंता नको! अवघ्या 1 मिनिटात मोबाईलवर करा डाउनलोड, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Aadhaar Download : आधार कार्ड जवळ नसेल कर गोंधळून न जाता काही सोप्या स्टेप्स लक्षात ठेवून तुम्ही ते डाउनलोड करू शकता.

Sakshi Sunil Jadhav

आजच्या काळात आधार कार्ड हे सर्वात महत्त्वात महत्त्वाचा पुरावा मानलं जात आहे. बँकेतलं काम, सरकारी योजनांचा लाभ, केवायसी किंवा ओळखीचा पुरावा अशा अनेक ठिकाणी आधार कार्डाची गरज असते. मात्र बऱ्याचदा घाईगडबडीत आधार कार्डासोबत ठेवायला विसरतो.अशा वेळी काळजी करण्याची गरज नाही. कारण तुम्ही घरबसल्या मोबाईलवर ई-आधार डाउनलोड करू शकता.

ई-आधार म्हणजे काय?

ई-आधार हे आपल्या मूळ आधार कार्डचे डिजिटल स्वरूप आहे. UIDAI म्हणजेच भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाकडून ते उपलब्ध करून दिलं जातं. ई-आधार PDF स्वरुपात डाउनलोड करता येते. यामध्ये आधारधारकाचं नाव, पत्ता, आधार क्रमांक आणि QR कोड यांसारखी माहिती असते. विशेष म्हणजे, ई-आधारची वैधता फिजिकल आधार कार्डइतकीच आहे.

ई-आधारकार्ड डाउनलोड करण्यासाठी काय आवश्यक?

१. आधार क्रमांक (Aadhaar Number)

२. एनरोलमेंट आयडी (EID)

३. व्हर्च्युअल आयडी (VID)

तसेच आधार कार्डाशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक जवळ असणं आवश्यक आहे. कारण नोंदणीकृत मोबाईलवर OTP पाठवला जातो.

मोबाईलवर ई-आधार डाउनलोड करण्याची सोपी प्रोसेस

सर्वात आधी UIDAI च्या अधिकृत https://uidai.gov.in या वेबसाइटला भेट द्या. वेबसाइटवरील 'Download Aadhaar' हा पर्याय निवडा. आधार क्रमांक, EID किंवा VID यापैकी एक माहिती भरा. स्क्रीनवर दिसणारा कॅप्चा कोड टाका. 'Send OTP' या पर्यायावर क्लिक करा. मोबाईलवर आलेला OTP टाकून पुढची प्रोसेस पूर्ण करा. आता ई-आधार PDF डाउनलोड करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tyre Nitrogen: कारच्या टायरमध्ये नायट्रोजन भरल्याने खरंच मायलेज वाढतं का?

Maharashtra News Live Update: राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये शिवसेनेकडून उघडले जाणार शेतकरी मदत कक्ष

Shivali Parab: अमेरिकेत पोहोचली शिवाली परब! गुलाबी फ्लोरल ड्रेसमधील सुंदर फोटोंनी वेधलं चाहत्यांचं लक्ष

Mumbai Rain : अर्णब चक्रीवादळाचा फटका! मुंबईसह ठाण्यात पाऊस; नागरिकांची उडाली तारांबळ

8th Pay Commission: महागाई भत्ता 63% वर फिटमेंट फॅक्टर किती असेल? कर्मचाऱ्यांच्या पगाराचे गणित समजून घ्या

SCROLL FOR NEXT