Ayushman Bharat Card Online Apply saam tv
बिझनेस

Ayushman Bharat Card : तुमच्याकडे आहे का आयुष्मान कार्ड? वर्षाला ₹5 लाखांपर्यंत मोफत उपचार, असा करा ऑनलाइन अर्ज

Ayushman Bharat Card Online Apply : आयुष्यमान भारत कार्डाच्या मदतीने कुटुंबांना वर्षाला ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळू शकतात. हे कार्ड ऑनलाइन काढता येतं.

Sakshi Sunil Jadhav

गंभीर आजारांवरच्या उपचारांचा खर्च बऱ्याचदा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जातो. अशा परिस्थितीमध्ये केंद्र सरकारची आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (AB-PMJAY) नागरिकांसाठी महत्त्वाची ठरते. या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना सूचीबद्ध रुग्णालयांमध्ये वर्षाला ५ लाख रुपयांपर्यंत कॅशलेस उपचार संरक्षण मिळू शकतं. त्यामुळे आयुष्यमान भारत कार्ड कसं काढायचं, पात्रता कशी तपासायची आणि कोणती कागदपत्रे लागतात, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.

आयुष्मान भारत कार्ड कोणाला मिळतं?

आयुष्मान भारत कार्ड या योजनेचा लाभ सरकारी निकषांनुसार पात्र असलेल्या कुटुंबांना मिळतो. लाभार्थ्यांची नावं अधिकृत डेटाबेसमध्ये तपासली जातात. तसेच ७० वर्षे आणि त्यावरच्या जेष्ठ नागरिकांसाठी उत्पन्नाची अट न ठेवता स्वतंत्र आयुष्यमान वय वंदना कार्डची सुविधाही मिळते.

महाराष्ट्रातल्या नागरिकांसाठी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत यांची एकत्रित अंमलबजावणी केली जाते. त्यामुळे राज्यातल्या नागरिकांनी संबंधित योजनेनुसार आपली पात्रता तपासली पाहिजे.

कार्ड काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे

आयुष्मान कार्ड तयार करण्यासाठी साधारणपणे पुढील कागदपत्रे जवळ ठेवा.

  • आधार कार्ड

  • रेशन कार्ड (लागू असल्यास)

  • आधारशी जोडलेला मोबाइल क्रमांक

  • अन्य मान्यताप्राप्त ओळखपत्र

  • आवश्यकतेनुसार रहिवासी किंवा कुटुंबाचा पुरावा

आयुष्मान कार्ड ऑनलाइन कसे काढायचे?

1. सर्वप्रथम beneficiary.nha.gov.in या अधिकृत पोर्टलला भेट द्या.

2. Beneficiary पर्याय निवडून मोबाइल क्रमांक आणि OTP द्वारे लॉगिन करा.

3. राज्य, योजना आणि जिल्ह्याची माहिती निवडा.

4. आधार क्रमांक किंवा उपलब्ध पर्यायाद्वारे लाभार्थ्याचे नाव शोधा.

5. नाव आढळल्यास ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करा.

6. पडताळणी आणि आवश्यक मंजुरी पूर्ण झाल्यानंतर उपलब्ध असलेल्या पर्यायातून आयुष्मान कार्ड डाउनलोड करा.

ऑनलाइन अर्ज करता येत नसेल तर...

ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण करण्यात अडचणी येत असतील तर जवळच्या CSC केंद्रात किंवा योजनेशी संबंधित रुग्णालयातल्या आयुष्मान मित्राची मदत घेता येते. महाराष्ट्रातले नागरिक jeevandayee.gov.in या अधिकृत वेबसाइटवरही माहिती तपासू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अजित पवारांच्या विमान अपघातावर भाजपचा गंभीर आरोप; रोहित पवारांच्या भूमिकेची चौकशी करण्याची नवनाथ बन यांची मागणी

Daily Walking Tips: दिवसाला १०००० पावलं चालणं खरंच गरजेचं आहे का? नेमकी किती पावलं चालायला हवीत?

Gas Lighter Cleaning Tips: गॅस लायटर स्वच्छ कसा करायचा? सोपी पद्धत आजच जाणून घ्या

Death News : काळाचा घाला! मुंबई-गोवा महामार्गावर प्रसिद्ध मराठी कवयित्रीचं अपघाती निधन, साहित्यविश्वावर शोककळा

Mumbai Dam Water Level: मुंबईकरांचे टेन्शन वाढणार, सातही धरणातील पाणीसाठ्यात घट, कोणत्या धरणात किती पाणीसाठा?

SCROLL FOR NEXT