Financial Planning Tips Saam Tv
बिझनेस

Financial Planning : गुतंवणूकीसाठी 50-20-30 चा रुल फॉलो करा, पैशांची अडचण कधीच भासणार नाही

Money Management Tips : तुम्ही कितीही कमावत असाल आणि त्याची बचत होत नसेल तर पुढे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो.

कोमल दामुद्रे

Financial Planning Tips:

वय वाढलं की, अनेकांना आपल्या भविष्याची चिंता सतावू लागते. तुम्ही कितीही कमावत असाल आणि त्याची बचत होत नसेल तर पुढे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो.

आजच्या काळात योग्य ठिकाणी गुंतवणूक केल्यास उत्पन्नात वाढ होते. प्रत्येक जण आपले उत्पन्न वाढवण्यासाठी अनेक प्रकारे आर्थिक पावले उचलतात. जर तुम्ही देखील आर्थिक नियोजन करण्याचा प्रयत्न करत असाल तर ५०-२०-३० चा हा रुल फॉलो करा. ज्याच्या मदतीने तुम्ही आर्थिक नियोजन करु शकता.

1. स्वत: ला पैसे द्या

जर तुम्ही कमावत असाल तर तुमच्या पगाराची ठराविक रक्कम तुम्ही तुमच्या खर्चासाठी काढा. त्यामुळे तुमचे आर्थिक ध्येय पूर्ण होईल. तसेच उर्वरित रक्कम तुम्ही इतर खर्च आणि गुंतवणूकीसाठी (Investment) वापरु शकता.

2. बचतीवर लक्ष केंद्रित करा

नेहमी तुमच्या बचतीकडे लक्ष द्या. महिन्याला बचतीची रक्कम निश्चित केली तर तुम्ही तुमचा आर्थिक खर्च योग्य प्रकारे सेट करु शकता. नोकरी (Job) करत असाल तर बचतीवर देखील लक्ष द्या. त्यामुळे भविष्यातील जबाबदाऱ्या व्यवस्थितपणे पार पाडू शकाल.

3. 50-30-20 नियम (Rules)

आर्थिक नियोजनासाठी 50-20-30 नियम नेहमी पाळले पाहिजेत. या नियमानुसार, पगारातील 50 टक्के रक्कम घरखर्चासाठी, 20 टक्के बचतीसाठी आणि 30 टक्के तुमच्यासाठी म्हणजेच जेवण, बाहेर फिरण्यासाठी ठेवावी.

4. 20/4/10 नियम

जर तुम्ही भविष्यात कार खरेदी करण्याचा विचार करत असाल किंवा नवीन कार खरेदी केली असेल, तर तुम्ही तिचा EMI वेळेवर भरण्यासाठी 20/4/10 नियम पाळू शकता. या नियमात तुम्ही डाउन पेमेंटसाठी 20 टक्के रक्कम वापरता आणि 4 म्हणजे ते वर्ष. तर, 10 म्हणजे तुमचा EMI.

5. आपत्कालीन निधी

बचतीसोबत तुम्ही इमर्जन्सी पैसे देखील जमा करायला हवे. अचानक आपत्कालीन परिस्थिती आल्यास पैशांची गरज भासते. अशावेळी आपत्कालीन निधी आपल्याकडे असेल तर तो आपल्याला मदत करतो. पगारातील थोडे पैसे त्यात टाकू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack : डोळ्यांत दिसतात हार्ट अटॅकचे 'हे' ५ संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT