Aadhaar mobile number update meta ai
बिझनेस

Aadhaar Update : आधार कार्डधारकांसाठी मोठी बातमी! मोबाईल नंबर बदलण्यासाठी ही प्रोसेस करा फॉलो

Aadhaar Mobile Number Update : तुम्हाला घरच्याघरी तुमचा फोन नंबर आधारकार्डाशी लिंक करायचा असेल तर ही प्रोसेस आता सोपी झाली आहे. तुम्ही घरबसल्या ही प्रोसेस पूर्ण करू शकता.

Sakshi Sunil Jadhav

सध्या सर्वच गोष्टी डिजिटल पद्धतीने करता येतात. रोजच्या भाजीपाल्यापासून ते बँकींग व्यवहार आता सोप्या पद्धतीने करता येतात. इतकंच नाही तर महत्त्वाची कागदपत्रंही तुम्हाला घरबसल्या बनवता येतात किंवा त्यामध्ये काही बदल करता येतो. त्यातच आधार कार्ड हा आता सर्वात महत्त्वाचा पुरावा आहे. आधार कार्डाला पुढे पॅन कार्ड, बँकेचे खाते आणि बऱ्याच गोष्टी लिंक केल्या जातात. मग त्यावर आलेल्या ओटीपीने तुम्हाला पुढील प्रोसेस करता येते.

बऱ्याचदा आपण फोन नंबर बदलतो. जुनं सिम कार्ड हरवल्यामुळे किंवा तो नंबर बंद करण्यासाठी आपण नवीन सिम घेतो. पण तेव्हाच तुम्ही आधारकार्डाशी तुमचा नंबर लिंक करणं गरजेचं असतं. आता तुम्हाला यासाठी आधार केंद्रावर जाण्याची गरज नाही. तुम्ही घरच्या घरी डिजिटल पद्धतीने ही प्रोसेस फॉलो करू शकता.

आधार अॅपवरून मोबाईल नंबर कसा बदलाल?

सर्वप्रथम मोबाईलमध्ये आधार अॅप डाउनलोड करून त्यावर नोंदणी करावी लागेल. यासाठी आधार क्रमांक टाकल्यानंतर आधारशी लिंक असलेल्या जुन्या मोबाी नंबरवर आलेल्या ओटीपीने पडताळणी करावी लागेल. त्यानंतर Face Authentication प्रोसेस पूर्ण करून सुरक्षा PIN तयार करावा लागेल.

नोंदणी पूर्ण झाल्यानंतर अॅपमधील Services विभागात जाऊन Mobile Number Update हा पर्याय निवडावा. त्यानंतर जुन्या नंबरवर आलेल्या ओटीपीने पुन्हा ओळख पडताळली जाईल. पुढे नवीन मोबाईल नंबर टाकून त्यावर आलेला OTP तपासावा लागेल. शेवटी Face Authentication करून ७५ रुपयांचा ऑनलाइन शुल्क भरावे लागेल. ही प्रोसेस काहीच मिनिटांत पूर्ण होईल. तर २४ तासांच्या आत नवीन मोबाईल नंबर आधार रेकॉर्डमध्ये अपडेट होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Afghanistan vs India, 1st T20I: भारतीयांसाठी आनंदाची बातमी; अभिषेक शर्मा तडाखेबाज खेळीनं अफगाण संघाचा फडशा

Afghanistan vs India, 1st T20I: पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम' वाजलं

Beed Crime: भय इथलं संपत नाही...; उपसरपंचाकडून तरुणाला अमानुष मारहाण VIDEO व्हायरल

भाजपला मोठा धक्का; माजी आमदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश, आणखी काही पुढारीही पक्ष सोडण्याच्या वाटेवर

धक्कादायक! बिल भरण्यावरून वाद; बार मॅनेजरला चौघांनी बेदम मारहाण|VIDEO

SCROLL FOR NEXT