LPG gas connection rules saam tv
बिझनेस

LPG Gas Connection : LPG गॅसचा मोठा नियम! एका घरात किती सिलिंडर कनेक्शनला परवानगी?

How Many LPG Connections Per Household : एका घरात किती LPG गॅस कनेक्शन घेता येतात याचे केंद्र सरकारचे नियम जाणून घ्या.

Sakshi Sunil Jadhav

घरात एकापेक्षा जास्त गॅस सिलिंडर कनेक्शन असावं, अशी अनेकांची इच्छा असते. पण एका कुटुंबाला किती घरगुती LPG कनेक्शन घेता येतात, याबद्दल केंद्र सरकारने नियम ठरवले आहेत. विशेष म्हणजे, एकाच घरात वेगवेगळ्या सदस्यांच्या नावावर अनेक कनेक्शन घेता येतात का, याचेही उत्तर सरकारी नियमांमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

एका घरात एकच LPG कनेक्शन

पेट्रोलियम प्लॅनिंग अँड अ‍ॅनालिसिस सेलच्या (PPAC) अधिकृत माहितीनुसार, एका कुटुंबाच्या एकाच घरात आणि सामायिक स्वयंपाकघरासाठी एकापेक्षा जास्त घरगुती LPG कनेक्शन घेता येत नाही. हा नियम इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम यांसारख्या सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांच्या घरगुती कनेक्शनसाठी लागू आहे.

सरकारच्या नियमानुसार 'कुटुंब' म्हणजे काय?

LPG (Regulation of Supply and Distribution) Order, 2000 नुसार, पती, पत्नी, अविवाहित मुले आणि अवलंबून असलेले आई-वडील एकाच निवासस्थानी आणि सामायिक स्वयंपाकघरात राहत असतील, तर त्यांना एक कुटुंब मानलं जातं. अशा कुटुंबातील कोणत्याही प्रौढ सदस्याच्या नावावर कनेक्शन दिले जाऊ शकतं.

अपवाद कधी मिळू शकतो?

नियमांमध्ये एक महत्त्वाची तरतूद आहे. LPG पुरवठा मिळवताना एखाद्या कुटुंबाला अडचण किंवा विशेष गैरसोय होत असल्यास केंद्र सरकार किंवा सरकारी तेल कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी एकापेक्षा जास्त कनेक्शन मंजूर करू शकतो. मात्र, ही मंजुरी आपोआप मिळत नाही.

PNG कनेक्शन असल्यास काय?

14 मार्च 2026 च्या सुधारित आदेशानुसार, ज्या ग्राहकांकडे पाइपद्वारे नैसर्गिक गॅस (PNG) कनेक्शन आहे, त्यांना घरगुती LPG कनेक्शन ठेवता येणार नाही किंवा नवीन कनेक्शन घेता येणार नाही. अशा ग्राहकांना विद्यमान LPG कनेक्शन तातडीने जमा करणे बंधनकारक आहे.

त्यामुळे एकाच घरात अनेक नावांवर कनेक्शन घेण्यापूर्वी नियम तपासणे महत्त्वाचे आहे. अधिक माहितीसाठी आपल्या गॅस वितरकाशी संपर्क साधावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips : BP वाढू द्यायचा नसेल तर आजपासूनच करा हे ५ बदल! हृदयाचे आरोग्य राहील चांगले

Maharashtra News Live Update:मनोज जरांगे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह.. विखे पाटलांचा राजीनामा आणि मराठा आरक्षण उपसमिती बरखास्त करण्याची मागणी

73 शिक्षकांची हकालपट्टी; आणखी 2,217 शिक्षकांवर कारवाईची टांगती तलवार, शिक्षण क्षेत्रात खळबळ

Indian Railways Ticket : रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! तिकीट बुकिंगचा नियम बदलला, वाचा संपूर्ण प्रोसेस

Indian Railways : देशातील पहिली बुलेट ट्रेन कोणत्या दोन स्टेशनदरम्यान धावणार? रेल्वेमंत्र्यांनी दिली नवी अपडेट

SCROLL FOR NEXT