2024 Hero Xtreme 160R 4V Saam Tv
बिझनेस

दिसायला भारी अन् फीचर्सही जबरदस्त, नवीन Hero Xtreme 160R 4V बाईक भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत

2024 Hero Xtreme 160R 4V: Hero MotoCorp ने आपली नवीन Xtreme 160R 4V बाईक लॉन्च केली आहे. यातच याची किंमत, फीचर्स आणि इतर सगळ्या गोष्टींबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...

Satish Kengar

भारतातील सर्वात मोठी दुचाकी उत्पादक Hero MotoCorp ने आपली नवीन Xtreme 160R 4V बाईक लॉन्च केली आहे. नवीन मॉडेलमध्ये काही बदल आणि नवीन फीचर्स समाविष्ट करण्यात आले आहेत. ही बाईक दिसायला खूपच आकर्षक आहे. यातच याची किंमत, फीचर्स आणि इतर सगळ्या गोष्टींबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...

किती आहे किंमत?

Hero Xtreme 160R ची किंमत 1.38 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. ही बाईक TVS Apache RTR 160 4V, Suzuki Gixer 155 आणि Bajaj Pulsar N160 शी स्पर्धा करेल. म्हणजेच आता या सेगमेंटमध्ये ग्राहकांसाठी आणखी एक नवीन पर्याय आला आहे.

Hero ने गेल्या वर्षी पहिल्यांदा Xtreme 160R 4V लॉन्च केली होती. ज्याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आता ही बाईक लॉन्च होऊन एक वर्ष झाले आहे, त्यामुळे कंपनीने आता याचा अपडेटेड व्हर्जन लॉन्च केला आहे. यात अनेक नवीन फीचर्स देण्यात आले आहेत.

इंजिन

नवीन Xtreme 160R 4V मध्ये 163.2 cc, सिंगल-सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे. जे 16.6 bhp आणि 14.6 Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 5-स्पीड गिअर बॉक्सने सुसज्ज आहे. बाईकच्या इंजिनमध्ये कंपनीने कोणताही बदल केलेला नाही.

या बाईकच्या पुढच्या बाजूला USD फॉर्क्स मिळतात आणि मागच्या बाजूला ॲडजस्टेबल मोनोशॉक प्रीलोड केले आहे. उत्तम ब्रेकिंगसाठी यात डिस्क ब्रेकची सुविधा आहे. बाईकमध्ये 17 इंच टायर बसवण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Varai Khichdi Upvas : उपवासाला साबुदाणे कशाला? झटपट करा वरईची खिचडी, नोट करा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अजित पवारांची निवड

Thackeray Brothers Reunion: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने विरोधकांची पायाखालची वाळू सरकली – शिवसैनिकांची प्रतिक्रिया|VIDEO

Actress Father shot: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर भरदिवसा गोळीबार; नेमकं काय घटलं? वाचा घटनाक्रम

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचा आशीर्वाद मलाच मिळाला; देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT