Hero Xtreme 125R Google
बिझनेस

Hero Xtreme 125R : स्पोर्टी लूक अन् उत्तम मायलेजसह Hero Xtreme 125R लाँच; स्वस्तात आणा घरी

Hero Xtreme 125R Launched In India: Hero MotoCorp ही देशातील सर्वात मोठी दुचाकी उत्पादक कंपनी आहे. कंपनीने नुकतीच आपली नवीन बाईक Hero Xtreme 125R लाँच केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Hero Xtreme 125R Price Features And specifications:

Hero MotoCorp ही देशातील सर्वात मोठी दुचाकी उत्पादक कंपनी आहे. कंपनीने नुकतीच आपली नवीन बाईक Hero Xtreme 125R लाँच केली आहे. ही बाईक भारतात विक्रीसाठी उपलब्ध झाली आहे. आकर्षक लूक आणि पॉवरफुल इंजिनसह ही स्पोर्टी बाईक भारतात लाँच झाली आहे. (Latest News)

किंमत

Hero Xtreme 125R नवीन लूकसह बाजारात लाँच झाली आहे. नवीन फीचर्ससह ही बाईक लाँच झाली आहे. हे फीचर्स पहिल्यांदाच बाईकच्या सेगमेंटमध्ये देण्यात आले आहे. या बाईकची किंमत ९५,००० रुपये आहे. Hero Xtreme 125R ABSची किंमत ९९,५०० रुपये तर Hero Xtreme 125R IBS या बाईकची किंमत ९५००० रुपये आहे.

Hero MotoCorp कंपनीच्या इतर बाईकच्या तुलनेत ही नवीन बाईक अधिक स्पोर्टी लूकसह प्रीमियम आहे. या बाईकमध्ये सिंगल चॅनल अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम (एबीएस) आणि एलईडी लाइट्स देण्यात आले आहे.

इंजिन

Hero Xtreme 125R बाईकमध्ये 125cc क्षमतेचे नवीन एअर कूल्ड इंजिन वापरण्यात आले आहे. हे इंजिन 8000 rpm वर 11.5bhp पॉवर जनरेट करते. हे इंजिन स्मूथ पॉवर रिस्पॉन्स आणि इन्स्टंट टॉर्क जनरेट करते, असा दावा कंपनीने केला आहे. यात स्पेशल इंजिन बॅलन्सर टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. पिकअपच्या बाबतीतही ही बाईक चांगली आहे. ही बाईक ५.९ सेकंदात ० ते ६० किमी/ ताशी वेग वाढवण्यास सक्षम आहे. ही बाईक ६६ किमी प्रति लिटर मायलेज देते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: हाजीर हो! राहुल गांधींच्या अडचणी वाढणार, सावरकरांच्या बदनामी प्रकरणात न्यायालयाचं समन्स

Uddhav Thackeray : मुंबईवर घाला घातला तर हम काटेंगे; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल,VIDEO

Watch Video: पावले धरती परतीची वाट! अरं 'देवा' भाऊच्या सभेकडे बहिणींनी फिरवली पाठ

Kolhapur Politics : पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारा प्रकार; कोल्हापुरात प्रचार पत्रकावर तांदूळ, कापलेला लिंबू, अंगारा

Inflation: महागाई कमी होणार? नेटकऱ्याच्या विनंतीनंतर अर्थमंत्री सीतारामन यांनी दिले मोठे संकेत

SCROLL FOR NEXT