Hero Splendor Plus Saam Tv
बिझनेस

60 Kmpl मायलेज अन् 76356 किंमत; जबरदस्त आहे Hero ची ‘ही’ बाईक

Hero Splendor Plus: दोन आठवड्यांची वेटिंग असूनही या बाईकची जोरदार बुकिंग सुरु आहे. याच बाईकच्या फीचर्सबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ…

Satish Kengar

हाय मायलेज देणाऱ्या स्वस्त बाईक्सची बाजारात मोठी मागणी आहे. या सेगमेंटची एक बाईक आहे, ज्याने गेल्या जूनमध्ये एकूण 2.8 लाख युनिट्सची विक्री केली आहे. ही बाईक एक लिटर पेट्रोलवर 60 kmpl पर्यंत धावते, असं कंपनीचं म्हणणं आहे.

आम्ही Hero Splendor Plus बद्दल बोलत आहोत. दोन आठवड्यांची वेटिंग असूनही या बाईकची जोरदार बुकिंग सुरु आहे. याच बाईकच्या फीचर्सबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ…

Splendor Plus चे बेस मॉडेल 76356 रुपये एक्स-शोरूम किंमतीत खरेदीसाठी उपलब्ध आहे. कंपनी या बाईकचे 4 प्रकार ऑफर करते. याच्या टॉप व्हेरिएंट स्प्लेंडर प्लस मॅट ॲक्सिस ग्रे मेटॅलिकची किंमत 98756 रुपये (ऑन-रोड) आहे. सेफ राइडसाठी ही बाईक डिस्क आणि ड्रम ब्रेक या दोन्ही पर्यायांसह येते. बाईकमध्ये सिंगल पीस सीट आहे.

9.8 लीटरची इंधन टाकी

हिरोच्या या पॉवरफुल बाईकला हाय स्पीडसाठी 4 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन देण्यात आले आहे. बाईकमध्ये मोठी हेडलाइट आणि डिझायनर टेललाइट आहे. मे 2024 मध्ये या बाईकचे एकूण 2.76 लाख युनिट्स विकले गेले आहेत. ही लांब पल्ल्यासाठी बेस्ट बाईक आहे. यात 9.8 लीटरची इंधन टाकी आहे.

फीचर्स

यात Combine braking system देण्यात आली आहे, ज्यामुळे दोन्ही टायर हाय स्पीडवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. बाईकमध्ये सेल्फ स्टार्टचे फीचर आहे. यात अलॉय व्हील आणि ट्यूबलेस टायर आहेत. बाईकमध्ये एक साधा हँडलबार आहे, ज्यामुळे लांबच्या मार्गावर बाईक चालवताना थकवा जाणवत नाही. यात डिजिटल कन्सोल आणि सिंगल पीस सीट आहे. बाईकला साइड स्टँड, हाय अँड एक्झॉस्ट आणि स्लीक टर्न इंडिकेटर देण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT