Home Insurance  Saam Tv
बिझनेस

Home Loanघेतलंय? पण घराचा विमा काढलाय का? काय आहेत Home Insurance चे फायदे जाणून घ्या!

Home Insurance: घराचा विमा काढलाय का? असा प्रश्न केला नंतर अनेकजण विचारात पडले असतील. सहाजिकच त्यांना या विषयीची कल्पनाच नसेल.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Home Insurance Benefits:

घराचा विमा काढलाय का? असा प्रश्न केला नंतर अनेकजण विचारात पडले असतील. सहाजिकच त्यांना या विषयीची कल्पनाच नसेल. गावातील पारावर हा विषय तुम्ही काढला तर या प्रश्नाने अनेकजण चक्रावतील. यातील अनेकजण म्हणतील आम्हाला गृह कर्ज माहितीये परंतु पण गृह विमा? हा घराचा विमा असतो का, असा त्यांचा उलट प्रश्न होईल. परंतु मित्रांनो, घराचाही विमा असतो शिवाय या विम्याचा खूप मोठा फायदा आपल्याला मिळत असतो. त्याचविषयी आपण आज जाणून घेणार आहोत. (Latest News On Business)

साध्या भाषेत समजून घ्यायचं म्हटलं तर गृह विम्याच्या माध्यमातून आपल्या मालमत्तेला सुरक्षा प्रदान करता येते. जर काही नैसर्गिक आपत्ती आली किंवा मानवनिर्मित संकट आले आणि त्यात घराचे नुकसान झाले. तर विम्यापासून आपल्या मालमत्तेला सुरक्षा मिळत असते. घर ही प्रत्येकाची गरज असते. घर बनवणं हे आपल्या सर्वांचे स्वप्न असते. पण घर बनवण्यासाठी खूप पैसा खर्च करावा लगतो. त्यामुळे अनेकजण होम लोन घेऊन घराचं स्वप्न पूर्ण करतात. या कर्जाची परतफेड दीर्घकाळासाठी असते.

असते. आपल्याला दीर्घकाळासाठी ईमएमआय भरावा लागतो. अशात जर काही नैसर्गिक आपत्ती आली आणि आपल्या घराचं नुकसान झालं तर मोठं आर्थिक संकट आपल्यासमोर निर्माण होत असतं. मग या संकटात तुम्हाला कोण नुकसान भरपाई देईल. त्यावर उत्तर आहे घराचा विमा (Home Insurance).यासाठी तुम्हाला घराचा विमा काढावा लागेल, आणि यासाठी एक निश्चित हप्ता देखील भरावा लागेल.

काय आहेत फायदे

होम इन्शुरन्स घेऊन अनेक फायदे मिळवू शकतात. दरम्यान यामध्ये तुम्ही केवळ घरच नाही तर घराबाहेरील परिसर, गॅरेज यांचाही यात समावेश करू शकतात. नैसर्गिक आपत्तीपासून घराचं संरक्षण करता येतं. नैसर्गिक आपत्तींतून नुकसान झाल्यास होम इन्शुरन्स काढणं आवश्यक असतं. या आपत्तीत भूकंप, अतिवृष्टी किंवा पुरामुळे अनेकवेळा घरांची पडझड किंवा नुकसान होतं.

यामुळे घराचं मोठं नुकसान होत असतं, त्याची भरपाई आपल्याला विम्यातून मिळते. तुम्ही घर बांधलं आहे आणि त्यात चोरी झाली तर त्यातून देखील संरक्षण आपल्याला मिळत असते. अशा अनेक पॉलिसी आहेत ज्या घरात चोरी झाल्यानंतरही आपल्याला नुकसान भरपाई मिळत असते.

घराच्या परिसराचा विमा

तुम्ही घराचा विमा घेतला असेल तर तुम्हाला फक्त घराच्या नुकसानाची भरपाई मिळत नाही तर त्याच्या परिसरातील इतर गोष्टीच्या नुकसानांची भरपाई मिळत असते. यासाठी घराचा विमा काढत असाल तर त्यावेळी तुम्हाला घराच्या परिसराची माहिती द्यावी लागेल. पॉलिसी घेताना तुम्हाला अ‍ॅड ऑन पर्याय निवडता येते. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक्स वस्तूही त्यात समाविष्ट करू शकतात.

घराचा विमा घेण्याचा सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे जर तुमची लायबलिटी कव्हर करणं होय. यात मालमत्तेचं नुकसान तसेच कामगार किंवा तृतीय पक्षाच्या आस्किमक मृत्यूपासूनही संरक्षण या विम्यातून मिळते.

गृह विम्याचे प्रकार

पहिला प्रकार हा बिल्डिंग इन्शुरन्स आहे, यात घर शारीरिकदृष्ट्या कव्हर केले जाते. तर दुसरा विमा प्रकार आहे सामग्री विमा आहे. यात घराला भौतिक तसेच घरात ठेवलेल्या सामनावरही कव्हर मिळते. दरम्यान कोणतीही पॉलिसी घेताना इतर कंपन्यांशी गृह विम्याची तुलना करू शकतात. विमा घेताना पैशाचे हप्ते आणि फीचर्स लक्षात घेणं आवश्यक असतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Shirsat: तुम्ही पण खा, आम्ही पण खाऊ"; संजय शिरसाटांच्या व्हिडिओवर इम्तियाज जलील यांचा सरकारवर घणाघात|VIDEO

Mumbai : मुंबईत राज ठाकरेंची डरकाळी! मनसेकडून 'मराठीची पाठशाळा', अमराठी व्यापाऱ्यांसाठी भाषेचा 'क्लास'

Mega Block : रविवारी मध्य-हार्बर रेल्वे मार्गावर ५ तासांचा मेगा ब्लॉक; कधी, कुठे आणि किती वाजता?

Kitchen Sponge: तुमचा भांडी घासण्याचा स्पंज टॉयलेट सीटपेक्षाही घाण; एकच स्पंज वापरण्याचा आरोग्यावर काय होतो परिणाम?

‘या’ ब्लड ग्रुपच्या व्यक्तींना असतो Brain Stroke चा अधिक धोका

SCROLL FOR NEXT