बिझनेस

GST Reforms: जीएसटी कपाती, 'ही' कार बनली जगातील सर्वात बजेट फ्रेंडली कार, GST नंतर मोठी बचत

Maruti S Presso: मारुती एस-प्रेसो आता बजेटमध्ये सर्वात परवडणारी कार ठरली आहे. साधी रचना, व्यावहारिकता आणि कमी किमतीमुळे ती जागरूक खरेदीदारांसाठी उत्कृष्ट पर्याय आहे, जरी सुरक्षा वैशिष्ट्ये मर्यादित आहेत.

Dhanshri Shintre

भारतीय वाहन बाजारपेठेत सध्या जीएसटी २.० सुधारणा मोठ्या चर्चेचा विषय ठरली आहे. या सुधारण्यामुळे कर रचनेत झालेला बदल थेट वाहनांच्या किंमतींवर परिणाम करत असून, ग्राहकांसाठी कार खरेदी अधिक परवडणारी झाली आहे. विशेष म्हणजे, मारुती सुझुकीच्या एंट्री-लेव्हल कार एस-प्रेसोने याचा सर्वाधिक लाभ घेतला आहे. दशकभरापासून भारतातील सर्वात परवडणारी कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अल्टो के१० चा हा किताब आता एस-प्रेसोने हिसकावून घेतला आहे.

एस-प्रेसो सर्वात स्वस्त कार

जीएसटी २.० लागू झाल्यानंतर मारुती सुझुकीने आपल्या लहान गाड्यांच्या किमतीत कपात केली आहे. एस-प्रेसोची सुरुवातीची किंमत आता केवळ ₹३.५० लाखांवर आली आहे. याउलट, अल्टो के१० ची सुरुवातीची किंमत ₹३.७० लाखांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे एस-प्रेसो केवळ सर्वात स्वस्त कार ठरली नाही, तर खरेदीदारांसाठी अधिक आकर्षक पर्याय बनली आहे.

सुरक्षा वैशिष्ट्यांमधील बदलांमुळे फरक

किंमतीतील हा फरक मुख्यतः सुरक्षा वैशिष्ट्यांमधील बदलांमुळे निर्माण झाला आहे. सरकारने प्रत्येक नव्या कारमध्ये सहा एअरबॅग अनिवार्य केल्याने अल्टो के१० आणि सेलेरियो या मॉडेल्सचे दर वाढले आहेत. मात्र एस-प्रेसो अजूनही दोन एअरबॅगपुरती मर्यादित असल्याने तिची किंमत तुलनेने कमी ठेवण्यात आली आहे.

जीएसटीचा मोठा परिणाम

याशिवाय, छोट्या पेट्रोल कारवरील जीएसटी करदर २८ टक्क्यांवरून १८ टक्क्यांपर्यंत घटवण्यात आला आहे आणि जीएसटी पूर्णपणे हटवण्यात आला आहे. या दोन्ही निर्णयांचा थेट परिणाम ऑन-रोड किंमतींवर झाला असून, ग्राहकांसाठी कार खरेदीची प्रक्रिया खूपच सुलभ झाली आहे.

मनोरंजक बाब म्हणजे देशातील सर्वात स्वस्त कार आता पारंपरिक हॅचबॅक नसून एसयूव्ही-शैलीच्या डिझाइनमध्ये आहे. एस-प्रेसोचा उंच ग्राउंड क्लीयरन्स, बॉक्सी लूक आणि क्रॉसओव्हर स्टायलिंगमुळे ती केवळ परवडणारी कार नाही, तर आकर्षक दिसणारा पर्याय ठरली आहे. विशेषतः दुचाकी वापरणाऱ्यांपैकी कारकडे वळणाऱ्यांसाठी ती एक उत्तम पर्याय बनत चालली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Reel Stunt Alert : रिलस्टारला खाकीचा दणका! बाईकवर स्टंटबाजी करणं आलं अंगलट, २२ हजारांचा दंड वसूल

Miraj News : भर रस्त्यावर रस्त्यावर खिळे टोचून टाकला लिंबू; अंधश्रध्येतुन प्रकार, नागरिकांमध्ये भीती

Maharashtra Live News Update: फडणवीस सरकारचा आणखी एक मोठा निर्णय; २२ उपजिल्हाधिकाऱ्यांची बढती होणार

Maharashtra Politics: पंढरपुरमध्ये CM फडणवीस यांचा मास्टरस्ट्रोक, ४ माजी आमदार भाजपच्या वाटेवर

क्रिकेट खेळताना भयंकर घडलं, पोटाला बॅट लागली अन् जागीच कोसळला, १३ वर्षीय मुलाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT