Post Office MIS Scheme Saam Tv
बिझनेस

Post Office MIS Scheme: फक्त एकदा गुंतवणूक करा अन् महिन्याला ५००० रुपये कमवा; पोस्ट ऑफिसची मासिक उत्पन्न योजना नक्की आहे तरी काय?

Post Office MIS Scheme Benefits: पोस्ट ऑफिसच्या नागरिकांसाठी अनेक योजना असतात. यातील एक योजना म्हणजे मासिक उत्पन्न योजना. या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला दर महिन्याला ५ हजार रुपये मिळतात.

Siddhi Hande

सर्वसामान्य नागरिकांसाठी सरकारच्या अनेक योजना असतात. सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास नागरिकांना भरघोस परतावा मिळतो. प्रत्येकजण आपल्या भविष्यासाठी वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. पोस्ट ऑफिसची मासिक उत्पन्न योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला प्रत्येक महिन्याला उत्पन्न मिळेल.

पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न योजनेत गुंतवणूकदारांना ७.४ टक्के व्याजदर मिळते. या योजनेत अकाउंट उघडल्यानंतर एका महिन्यानंतर तुम्हाला व्याजदर मिळण्यास सुरुवात होईल. या योजनेत योग्य परतावा मिळण्याची गॅरंटी मिळते.

पोस्ट ऑफिसमध्ये तुम्ही १००० रुपयांपासून गुंतवणूक करु शकतात. या योजनेत तुम्हाला स्वतः चे वैयक्तिक अकाउंट तसेच जॉइंट अकाउंटदेखील उघडू शकतात. तुम्ही स्वतः चे वैयक्तिक अकाउंट उघडल्यास जास्तीत जास्त ९ लाख रुपये गुंतवणूक करु शकतात. जॉइंट अकाउंटमध्ये १५ लाख रुपये गुंतवणूक करु शकतात. १८व्या वर्षांवरील प्रत्येक व्यक्ती या योजनेत अकाउंट उघडू शकतात.

या योजनेत तुम्ही गुंतवणूक केल्यावर तुम्हाला ५ हजार रुपये मासिक उत्पन्न मिळू शकतात. जर तुम्ही ५ लाख रुपयांची गुंतवणूक केली तर ७.४ टक्के व्याजदर मिळते. म्हणजेच तुम्हाला ३,८०३ रुपयांचे व्याज मिळेल. जेव्हा तुम्ही ९ लाख रुपये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला ५५५० रुपये व्याज मिळेल. या योजनेचा लॉक इन कालावधी ५ वर्षांचा आहे.

जर तु्म्ही जॉइंट अकाउंट सुरु केल्यावर जास्तीत जास्त १५ लाख रुपये गुंतवणूक करु शकतात. या गुंतवणूकीवर तुम्हाला दर महिन्याला ९,२५० रुपये व्याजदर मिळेल. त्यामुळे तुम्हाला दर महिन्याला निश्चित इन्कम मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT