Scheme For Youth Saam Tv
बिझनेस

Government Scheme : तरुणांना महिन्याला मिळणार ₹१०००; पंतप्रधान मोदींनी लाँच केली नवी योजना

Bihar Scheme for Youth: पंतप्रधान मोदींनी आज मोठी घोषणा केली आहे. त्यांनी बिहारच्या तरुणांसाठी एक योजना सुरु केली आहे. या योजनेत तरुणांना दर महिन्याला १००० रुपये मिळणार आहेत.

Siddhi Hande

पीएम मोदींचं बिहारला मोठं गिफ्ट

तरुणांसाठी लाँच केली नवी योजना

५ लाख तरुणांना दर महिन्याला मिळणार १००० रुपये

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारच्या तरुणांना मोठं गिफ्ट दिलं आहे. पंतप्रधान मोदींनी आज युवा संवाद कार्यक्रमाद्वारे तरुणांशी संवाद साधला आहे. हा कार्यक्रम ऑनलाइन होता. या माध्यमातून त्यांनी बिहारमधील हजारो तरुणांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जवळपास ६२,००० कोटींपेक्षा जास्त रुपयांच्या प्रकल्पाचे उद्घाटन केले. याचसोबत अनेक योजना देखील लाँच केल्या.

पंतप्रधान मोदींनी तरुणांसाठी नवीन योजना सुरु केली आहे. मुख्यमंत्री स्वयं सहात्ता भत्ता योजना असं या योजनेचं नाव आहे. या योजनेअंतर्गत तरुणांना आर्थिक मदत केली जाणार आहे. या योजनेअंतर्गत तरुणांना दर महिन्याला १००० रुपये दिले जाणार आहे.

काय आहे योजना? (Bihar Scheme For Youth)

या योजनेअंतर्गत पाच लाख तरुणांना दर महिन्याला आर्थिक मदत केली जाणार आहे. दोन वर्षांसाठी हे पैसे दिले जाणार आहेत. याचसोबत त्यांना मोफत कौशल्य प्रशिक्षणदेखील दिले जाणार आहे. बेरोजगार तरुणांसाठी ही योजना फायद्याची ठरणार आहे.

स्टूडंट क्रेडिट कार्डचेही उद्घाटन

पीएम मोदी यांनी स्टुडंट क्रेडिट कार्ड योजना सुरु केली आहे. या योजनेत तरुणांना ४ लाख रुपयांचे कर्ज दिले जाते. यावर कोणतेही व्याजदर घेतले जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी हे कर्ज दिले जाते. यामुळे ३.९२ लाख विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. या योजनेअंतर्गत ७,८८० कोटींचे कर्ज दिले जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MSRTC News: ‘आपली एसटी’ कुठंय? आता प्रवाशांना मिळणार MSRTC बसेसचं रिअल-टाइम अपडेट्स

IND Vs AUS: ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे आणि टी-२० सीरीजसाठी हार्दिकला वगळलं, नेमकं कारण काय?

GK : भारतामधील सर्वात जास्त शिकलेले राज्य कोणते आहे? जाणून घ्या

Shocking : एकाच तरुणीला दोघांनी ब्लॅकमेल करून केला बलात्कार, शिक्षकाच्या काळ्या कृत्यामुळे परभणी हादरली

खरंच मध कधीच खराब होत नाही का?

SCROLL FOR NEXT